
Impact on Pakistani Military Forces : भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे घायाळ झालेल्या पाकिस्तानला पुन्हा मोठा झटका बसला आहे. अजून ही जखम ताजी असतानाच पाकिस्तानी सैन्यांवरच मोठा हल्ला करण्यात आला आहे. बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानी लष्कराचे वाहन बॉम्बने उडविण्यात आले असून त्यामध्ये 14 सैनिक मारले गेल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. यामध्ये प्रमुख दहशतवादी संघटनांची मुख्यालये नेस्तनाबूत करण्यात आली आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. भारताला प्रत्युत्तर देण्याची भाषा केली जात आहे. पण दुसरीकडे पाकिस्तानसमोर घरभेद्यांकडूनच मोठे आव्हान उभे करण्यात आले आहे.
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांत मागील काही वर्षांपासून धुमसत आहे. येथील बलुच लिबरेशन आर्मी या बंडखोर संघटनेकडून सातत्याने पाक सैन्याला टार्गेट केले जात आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर या भागात आनंदोत्सव साजरा झाल्याचे व्हिडीओही समोर आले होते. त्यानंतर या बंडखोरांनी पाक सैन्याला लक्ष्य केले आहे.
बलुच प्रांतातील बोलानमधीलल शोरकंद भागातून सैन्याचे एक वाहन जात असताना ते रिमोट कंट्रोलद्वारे आयडी स्फोटाने उडविण्यात आले. स्फोटानंतर वाहनाचे तुकडे हवेत उडाल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या स्फोटात पाकिस्तानी लष्करातील स्पेशल ऑपरेशन कमांडर तारिक इम्रान आणि सुभेदार उमर फारूख यांच्यासह 12 सैनिक मारले गेले असल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याच्या कुटुंबातील 10 जण या ऑपरेशनमध्ये मारले गेले आहेत. दहशतवाद्यांच्या तळांचे मोठे नुकसान झाले आहे. या ऑपरेशनमध्ये सामान्य नागरिक किंवा सैन्याला लक्ष्य करण्यात आले नव्हते, असे भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे. मात्र, पाकिस्तानकडून भारताच्या हल्ल्यात 26 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.