CJI Surya Kant Sarkarnama
देश

CJI Surya Kant : सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्याकडून बेरोजगार तरुणांची तुलना 'झुरळांसोबत' : पत्रकारांबद्दलही वादग्रस्त विधान

Justice Surya Kant controversial statement : सरन्यायाधीश सुर्य कांत यांनी एका सुनावणी दरम्यान वादग्रस्त वक्तव्य करत बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांसोबत करत ते व्यवस्थेवर हल्ला करतात असे म्हटले आहे.

Roshan More

CJI News : सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणी दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.सरन्यायाधीश सूर्य कांता आणि न्यायमूर्ती जाॅयमाल्य बागची यांच्या खंडासमोर एका वकिलाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात याचिका केली होती.

या याचिकेच्या सुनावणी दरम्यान, त्या वकिलावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्यांनी काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली अन् ते पुढे म्हणाले की, असे बेरोजगार तरुण पुढे जाऊन पत्रकार, समाज माध्यम, आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करतात.

याचिका करणाऱ्या वकिलाचे सोशल मीडियावरील लेखन पाहून सरन्यायाधीश म्हणाले की, समाजामध्ये पॅरासाईड (परजीवी) कमी नाहीत जे व्यवस्थेवर हल्ला करतात. तुम्हीला त्यांच्यात सामील व्हायचे आहे का?

याचिका करणाऱ्या वकिलाने फेसबूकवर वापरलेली भाषा त्यांची वरिष्ठ म्हणून नियुक्ती करण्यास योग्य नसल्याचे मत न्यायालयाने नमूदन केले. तसेच सरन्यायाधीशांनी म्हटले की, ते फेसबूक जे लिहितात, पोस्ट करतात त्यांना वाटते व्यवसायिक शिस्त काय असते ते मी दाखवतो.

दरम्यान, वकिलाला खडे बोल सुनावत सरन्यायाधीश म्हणाले की, कदाचित सगळेच जग वरिष्ठ वकील पदासाठी पात्र ठरेल मात्र तुम्ही या पदासाठी पात्र नाही. जर दिल्ली न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून तुमची नियुक्ती केली असती तर सर्वोच्च न्यायालय म्हणून आम्ही तो निर्णय रद्द केला असता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT