Maharashtra News Live Update: राज्य सरकारचा 'आयएलएस' महाविद्यालयाला दणका, विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क व्याजासह परत करण्याचे निर्देश

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on 27 April महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) प्रशासकीय, आर्थिक, शैक्षणिक तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

राज्य सरकारचा 'आयएलएस' महाविद्यालयाला दणका, विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क व्याजासह परत करण्याचे निर्देश

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथील आयएलएसविधी महाविद्यालयाबाबत मोठे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या बेकायदेशीर शुल्क वसुली प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आयएलएस महाविद्यालयाला विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क सहा टक्के व्याजासह परत करण्याचे निर्देश मंत्री पाटील यांनी दिले आहेत.

पुणे रेल्वे स्टेशनमधील धक्कादायक घटना; वंदे भारत ट्रेनच्या चौथ्या डब्ब्याची एक ट्रॉली ट्रॅकवरुन घसरली

पुणे रेल्वे स्टेशन येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सीएसएमटी ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना रुळावरुन घसरल्याची माहिती मिळत आहे. वंदे भारतच्या चौथ्या डब्याची एक ट्रॉली सोमवारी (ता.27) सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास डायमंड क्रॉसिंगवर घसरली. पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत या क्रॉसिंगच्या अपग्रेडचे काम नियोजित आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना दुसऱ्या रेकमध्ये हलवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे...

Eknath Shinde : पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या नावाने एकनाथ शिंदेंना पत्र

पक्ष संघटनेसाठी नीलम गोऱ्हे यांनी काही केले नसून उलट महिलांचे खच्चीकरण होईल यावर त्यांनी भर दिल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे. महिलांचे चरित्र हनन करुन त्यांच्यात भांडणे लावून संघटनेचे मोठे नुकसान केले आहे. नीलम गोऱ्हे या सर्वांना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा आमदार करणार असल्याचा शब्द दिला असल्याचे सांगत आहेत. नीलम गोऱ्हे यांच्या ऐवजी सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी दिली तर कार्यकर्ता तुम्हाला सलाम करेल असे या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. अन्यथा उध्दव ठाकरे यांच्याप्रमाणे तुम्हाला पुन्हा एकदा बाईने फसवले असे पत्रात म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात तारीख व कुणाचे नाव नसून पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडी या नावाने पत्र देण्यात आलं आहे.

Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही भूमिका स्पष्ट

राज्य सरकारच्या या निर्णयाला मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक नाराज आहेत. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी सरकारला थेट संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. यामुळे मराठीसक्तीच्या मुद्द्यावरुन मुंबईत राजकारणदेखील तापताना दिसत आहे. याच प्रकरणात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. विशेष म्हणजे या मुद्द्यावर आता महायुतीच्या पक्षांचे एकमत होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठी बोलावीच लागणार आहे.

Amol Mitkari On Jay Pawar : 'जय पवारांना विधान परिषदेत पाठवा' राष्ट्रवादीचे आमदार मिटकरींचे ट्विट

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेच्या एका जागेसाठी सध्याच्या परिस्थितीत जय पवार हे सर्वोत्तम नाव असल्याचं ट्विट आमदार अमोल मिटकरी यांनी केलंय... भविष्यात हा चेहरा महाराष्ट्रासाठी दादांसारखाच आश्वासक वाटतो असंही मिटकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय...

Nida Khan Nashik टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम

टीसीएस धर्मांतर प्रकरणात निदा खानच्या अंतरिम अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र,सनाशिकरोड न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीनासाठीचा निकाल राखून ठेवला असून २ मेला न्यायालय अंतरिम अटकपूर्व जामिनावर निकाल देणार आहे. त्यामुळे टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानवर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

Pune News : पुण्यातील ILS लॉ कॉलेजमध्ये रॅगिंग, 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा

पुण्यातील ILS लॉ कॉलेजमध्ये रॅगिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा छळ केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. यासंदर्भात ३५ वर्षीय विद्यार्थ्यानं तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांवर महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाय. शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप तक्रारदार विद्यार्थ्यानं केलाय....

Ashok Kharat Case भोंदू खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला, खरातला 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

भोंदू खरातचा पोलीस कोठडीतील मुक्काम वाढलाय..खरातला सातव्या गुन्ह्यात 29 एप्रिलपर्यंत म्हणजेच 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.. खरात गेल्या 40 दिवसांपासून कोठडीत असून, त्याच्यावर नाशिकमध्ये आतापर्यंत 12 गुन्हे दाखल झालेय.

Jay Pawar news : अमोल मिटकरींनी सुचवले जय पवारांचे नाव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जय पवार यांचे नाव पुढे केले आहे. विधानपरिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते व नेत्यांच्या जवळच्या लोकांची लॉबिंग व चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्ष वाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासु व युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे.सद्यस्थिती जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे, अशी पोस्ट मिटकरी यांनी सोशल मीडियात केली आहे.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांचा मोठा निर्णय

दिल्लीतील सत्र न्यायालयाने मद्य धोरण प्रकरणावर दिलेल्या निकालाला सीबीआयने दिल्ली हायकोर्टात आव्हान दिले आहे. न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी स्वत: किंवा वकिलामार्फत हजर न राहण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. न्यायाधीश शर्मा यांची दोन्ही मुले केंद्र सरकारच्या वकिलांच्या पॅनेलमध्ये असल्याचा दावा केजरीवालांनी केला आहे.

Marathi language row : मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ मिळणार

राज्यातील रिक्षा व टॅक्सीचालकांना सरकारने मराठी शिकणे बंधनकारक केले आहे. येत्या एक मेपासून त्याची अंमलबजावणी केली जाणार होती. पण विरोधानंतर आता सरकार एक पाऊल मागे जाण्याच्या तयारीत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज याबाबत झालेल्या बैठकीनंतर मुदतवाढ देण्याबाबत सकारात्मक भूमिका जाहीर केली.

KEM Hospital news : केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास विरोध

मुंबईतील केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने विरोध केला आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नाव बदलण्याची मागणी केली आहे. त्याविरोधात आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले.

आपच्या 7 खासदारांना दिलासा; भाजपमध्ये प्रवेशास मंजुरी

आपच्या सात खासदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला राज्यसभा सचिवालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे संसदेतील भाजपची ताकद वाढली असून राज्यसभेत पक्षाची एकूण संख्या आता 113 वर पोहोचली आहे.

उदगीरमध्ये बागेश्वर महाराजांविरोधात संतप्त आंदोलन

लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बागेश्वर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या. संतप्त कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज चौकात जमून प्रतीकात्मक फोटोला जोडे मारत आंदोलन केले आणि जोरदार घोषणाबाजी केली.

पोलिसांना जिवंत माणसं महत्त्वाची नाहीत, पण मुख्यमंत्र्यांचा पुतळा महत्त्वाचा आहे - प्रशांत आंबी

पोलिसांना जिवंत माणसं महत्त्वाची नाहीत, पण मुख्यमंत्र्यांचा पुतळा महत्त्वाचा आहे, असं म्हणत प्रकाशक प्रशांत आंबी यांनी पोलिसांच्या कृत्याचा निषेध केला.

कोल्हापुरातील बिंदू चौकात पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी कोल्हापुरातील बिंदू चौकात डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात प्रकाशक प्रशांत आंबी देखील सहभागी झाले आहेत. तर यावेळी पोली आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली आहे.

मराठी सक्तीला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्तेंच मनसेकडून निषेध

मराठी सक्तीला विरोध करणारे वकील गुणरत्न सदावर्तेंच मनसेकडून निषेध, बॅनरवर सदा रडते असा उल्लेख करत केला निषेध

TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

TCS प्रकरणातील आरोपी निदा खान गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहे. तिने गर्भवती असल्याचे कारण देत निदा खानचा अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.

फर्टीलायझर असोसिएशन कडून बेमुदत संप

महाराष्ट्रात आजपासून कृषी केंद्र चालकांनी सरकारच्या विरोधात आपली दुकाने बंद ठेवून आजपासून बेमुदत संप पुकारला. या संघटनेच्या संपाला देशातील फर्टीलायझर असोसिएशनने देखील एक दिवसाचा पाठिंबा दिला आहे.

पुण्यातील ILS लॉ कॉलेजमधील रॅगिंगचा धक्कादायक प्रकार आला समोर

पुण्यातील आयएलएस विधी महाविद्यालयातील रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका 35 वर्षीय विद्यार्थ्याला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पोलिसांनी 5 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सुनावणीस हजर राहणार नाही, केजरीवालांचं न्यायमूर्ती स्वर्ण कांता यांना पत्र

दिल्लीचे माजी मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांना कथित दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते. तपास यंत्रणेने या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. मात्र, केजरीवाल यांनी न्यायमूर्ती शर्मा यांच्यासमोर हजर न होण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजपचा विधान परिषदेचा 'फायनल' ड्राफ्ट मुंबईत तयार

भाजपचा विधान परिषदेचा 'फायनल' ड्राफ्ट मुंबईत तयार झाला असून, आता फक्त हायकमांडच्या मोहोर उमटवण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीवारी करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ५ जागांसाठी भाजपने 'सोशल इंजिनिअरिंग' आणि 'संघटन' असा दुहेरी फॉर्म्युला निश्चित केला आहे. दिल्लीत पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीनंतर नावांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

MLC Election 2026 : बच्चू कडू यांना विधान परिषदेची शिवसेनेकडून उमेदवारी; प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलिनीकरणाची चर्चा?

विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेकडून बच्चू कडू यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. परंतु शिवसेनेच्या नेत्यांनी बच्चू कडू यांच्यासमोर प्रहार जनशक्ती पक्ष अन् संघटना शिवसेनेत विलिनीकरणाची अट ठेवली आहे. यावर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चांनी जोर धरला आहे. परंतु बच्चू कडू यांच्याकडून यावर अजून कोणताही खुलासा झालेला नाही.

Dhirendra Shastri in Navi Mumbai : धीरेंद्र शास्त्रीच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक विधान, नवी मुंबई काँग्रेसचे आंदोलन

धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप आणि संघावर हल्लाबोल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या वेळी कार्यकर्त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करत, त्यांच्या प्रतिमेला प्रतीकात्मक चपलेचा मारा दिला .

Ahilyanagar Update : भोंदू राजेंद्र गडगे महाराज याला आज न्यायालयात हजर करणार

संगमनेरचा भोंदू राजेंद्र गडगे महाराज याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. चार दिवसांची त्याची पोलिस कोठडी आज संपणार आहे. भोंदू राजेंद्र गडगे 9 दिवसांपासून पोलिस कोठडीत आहे. राजेंद्र गडगे महाराज याचे साथीदार डॉ. मोहन पुरी, मुलगी ज्ञानेश्वरी गडगे आणि सुरज शिंदे हे तिघे अद्याप पसार आहेत.

Beed Update : मित्रांनीच काढला, मित्राचा काटा; धारदार शस्त्राने वार करत संपवलं

बीडच्या बेलुरा गावातील सुमित गवते नामक युवकाची त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने अंगावरती वार करत संपवल आहे. माझ्या पत्नीचे आक्षेपार्ह फोटो का टाकले, असे या कारणावरून धारधार शस्त्राने वार करत क्रूर हत्या करण्यात आली आहे. गावातीलच विशेष म्हणजे, मारेकरी निघाला होमगार्ड मारेकऱ्यांनी क्रूर पद्धतीने अंगावरती वार करत सुमित गवते नामक युवकाला संपवल आहे. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यामध्ये आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपाला ताब्यात घेतलं आहे.

Marathi Language : मराठी सक्तीच्या मुद्यावरून आज मंत्रालयात साडेबारा वाजता बैठक होणार

रिक्षा चालकांना मराठी भाषा सक्तीवरून, राज्यात गदारोळ सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थित साडेबारा वाजता मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा सक्तीला विरोध करणारे नेते देखील या वेळी उपस्थित राहणार आहे.

Pune Crime : पैशांच्या वादातून दहशत; वाहनाच्या बोनटवरून फरपटत नेण्याचा थरार CCTV मध्ये कैद

पुणे इथल्या खेड तालुक्यातील काळूस गावात पैशांच्या वादातून सुरू झालेल्या भांडणाने भीषण रूप घेतलं. चारचाकी गाड्यांमधून आलेल्या टोळक्याने गावात दहशतीचा थरार माजवत हॉकी स्टिकने बेदम मारहाण केली आणि एकाला चक्क गाडीच्या बोनटवरून फरपटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरात कैद झाला आहे.

BJP Politics : पद्म पुरस्कारांच्या शिफारसीच्या समितीतून भाजपचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना वगळले

पद्म पुरस्कारांच्या शिफारसीच्या समितीतून भाजपचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना वगळण्यात आलं आहे. राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जाहीर करण्यात आली आहे. परंतु गेल्या काही समित्यांमध्ये सांस्कृतिक मंत्री यांचा समावेश असायचा. विशेष म्हणजे, मुंबईतील कोणत्याही मंत्र्यांना या समितीत स्थान देण्यात आलेले नाही.

Nashik TCS Update : धर्मांतर प्रकरणातील पसार निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

नाशिमधील टीसीएसमधील धर्मांतर प्रकरणाती पसार निदा खान हिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. निदा खान ही गर्भवती असल्याचा दावा गेल्यावेळी करण्यास आला होता. त्यामुळे न्यायालय आजच्या सुनावणीत कोणता निर्णय देत आहे, याकडे लक्ष लागलं आहे

Revenue Department : एक हजार रुपये शुल्कात ग्रामपंचायतीच्या दप्तरात घरांची नोंदणी होणार

गोरगरिबांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार 2011 पूर्वी गायरान व सरकारी जागेवर बांधलेली निवासी घरे नियमित केली जाणार आहेत. या निर्णयामुळे भटके विमुक्त, पारधी समाजासह अनेक गरिबांना मोठा आधार मिळेल. केवळ एक हजार रुपये शुल्क आकारून ग्रामपंचायतीच्या दप्तरात या घरांची नोंदणी करून मालकी हक्क दिला जाईल, असेही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

Pune Crime : पुण्यातील आयएलएस लाॅ काॅलेजमधील रॅगिंग प्रकार पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

पुण्यातील आयएलएस लाॅ काॅलेजमधील रॅगिंगचा प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्याला त्रास देणाऱ्या पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पाच विद्यार्थ्यांनी शिवीगाळ अन् मानसिक त्रास दिल्याचे, विद्यार्थ्यांने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी तक्रारीनुसार माहिती घेत, गु्न्हा नोंदवला आहे.

Chandrashekhar Bawankule : पाच वर्षांत सर्व पाणंद रस्ते बारमाही केले जाणार; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, शेतीच्या रस्त्यांचे वाद मिटवण्यासाठी पुढील पाच वर्षांत सर्व पाणंद रस्ते बारमाही केले जातील व त्यांच्या कडेला वृक्षलागवड केली जाईल. सातबारा उताऱ्यावरील मृत व्यक्तींचे नाव कमी करण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी तहसीलदारांनी स्वतःहून ही दुरुस्ती करावी. जमिनीच्या मोजणीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी खासगी मोजणीदार नेमून ड्रोनच्या साहाय्याने केवळ पंधरा दिवसांत मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही मंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Dharashiv Update : तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीत अतिक्रमण हटाव मोहीम;1500 हून अधिक अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

तुळजापूर शहरातील भवानी रोड, महाद्वार परिसर, खडकाळ गल्लीसह विविध परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. तुळजापूर शहरात नगरपालिकेच्यावतीने तीन दिवस अतिक्रमण विरोधी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत शहरातील जवळपास 1500 पेक्षा अधिक अतिक्रमणे हटवण्यात आली असून, दीर्घकाळानंतर शहराने मोकळा श्वास घेतल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात पालिकेच्या पथकाने JCB च्या साह्याने कारवाई करत अतिक्रमणे हटवली.

Amravati Update : अमरावती परतवाडा लैंगिक अत्याचारातील आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार

अमरावतीच्या परतवाडामधील लैगिंक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदसह तीन आरोपींची आज पोलिस कोठडी संपत आहे. या आरोपींना आज दुपारी पुन्हा अचलपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आतापर्यंत या आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. तर दुसरीकडे मुख्य आरोपी अयान अहमदचा पायात खोलात गेला; पुन्हा एक 16 वर्षीय युवतीने SIT समोर येत, जबाब नोंदवला आहे. आरोपी अयान याने माझ्या इच्छेविरुद्ध मला स्पर्श केल्याचे युवतीने SIT समोर जबाब दिला आहे.

Agricultural Service Center Owners Strike : खत टंचाईचा भडका; आज 85 हजार कृषी केंद्र चालकांच्या 'बंद'मुळे शेतकरी कोंडीत

राज्यात एकीकडे रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत असतानाच, आता खतविक्रेत्यांनी आजपासून (ता. 27) बेमुदत बंद पुकारल्याने खळबळ उडाली आहे. खत कंपन्यांकडून होणारी लिंकिंगची सक्ती आणि प्रशासकीय जाचक अटींविरुद्ध महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइडस, सीड्‌स डिलर्स असोसिएशनने (माफदा) पुकारलेल्या या आंदोलनामुळे आगामी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यभरातील 85 हजार कृषी केंद्र चालक संपावर गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com