Political News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान पक्षाला बळकटी देण्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी रविवारी शिवसेनेच्या तब्बल 15 राज्याच्या राज्यप्रमुखांची महत्वाची बैठक श्रीनगरमध्ये घेतली. या बैठकीत बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड यांच्यासह इतर राज्यातील प्रभारी उपस्थित होते.
राज्याबाहेर ते देखील थेट श्रीनगरमध्ये पहिल्यांदाच पार पडलेल्या शिवसेनेच्या या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या 15 राज्याच्या राज्य प्रमुखांची संवाद साधला. आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि शिवसेना हा पक्ष इतर राज्यामध्ये पोहचवून पक्षाचे संघटन अधिक भक्कम करण्यासाठी राज्य प्रमुखांना मुख्यमंत्री शिंदेंनी कानमंत्र दिला आहे.
याबरोबरच केंद्रीय स्तरावर भाजपसोबत शिवसेनेची युती आहे. त्यामुळे त्यांची मदत घेऊन शिवसेना पक्ष वाढवा, अशा सूचना या बैठकीत 15 राज्याच्या राज्यप्रमुखांना देण्यात आल्या आहेत. याबरोबरच राज्य प्रमुखांनी त्यांना येणाऱ्या समस्याही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मांडल्या. शिवसेनेला राष्ट्रीय स्तरावर मजबूत करण्यासाठी संघटनात्मक पाऊल उचलत थेट 15 राज्याच्या राज्यप्रमुखांची थेट श्रीनगरमध्ये बैठक घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी जम्मू-कश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांचीही भेट घेतली. या भेटी दरम्यान, जम्मू-कश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे राज्यपाल सिन्हा यांच्याकडे केली आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.