Eknath Shinde: ठाण्यातला विषय माझ्या दृष्टीने संपला; असं म्हणत मुख्यमंत्र्यांचा वादावर टाकला पडदा

Political News: मुख्यमंत्री शिंदे हे सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP : गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत शिंदे गट आणि भाजपमध्ये वाद सुरू आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीवरून भाजप आणि शिवसेना आमने-सामने आले. यावरून भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेला मदत न करण्याचा ठराव मंजूर केला.

त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राजीनाम्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रकारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, "ठाण्यातील वादाची गोष्ट फार लहान आहे. त्यामुळे तो विषय आता संपला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामुळे मला आता यावर जास्त बोलण्याची आवश्यकता वाटत नाही", असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं. मुख्यमंत्री शिंदे हे सध्या जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर असून माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde
Shivsena News: ठाकरे गटाच्या शाखा प्रमुखावर हल्ला; चौघांविरोधात तक्रार दाखल

आगामी निवडणुकीत राज्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे एकत्र निवडणुका लढतील, असं सुतोवाच भाजपसह शिवसेनेच्या नेत्यांनी अनेक वेळा केलं. मात्र, कल्याण-डोंबिवलीत शिंदे गट आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाची महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या वादावर प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

Eknath Shinde
Cm Eknath Shinde In Kashmir News : मुख्यमंत्री शिंदे कुटुंबासह काश्मिर दौऱ्यावर, `महाराष्ट्र भवन` उभारण्यासाठी जागा मागितली..

दरम्यान, एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज जम्मू-कश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली. यावेळी जम्मू-कश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे राज्यपाल सिन्हा यांच्याकडे केली आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.