Andhra Pradesh Politics: आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांचे काका वाय.एस. भास्कर रेड्डी यांना शनिवारी (१५ एप्रिल) अटक केली. माजी खासदार विवेकानंद रेड्डी यांच्या हत्येप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. विवेकानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांचे भाऊ आणि विद्यमान मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचे काका होते. 15 मार्च 2019 रोजी पुलिवेंडुला भागातील त्यांच्या राहत्या घरी त्यांची हत्या करण्यात आली
एसआयटीने प्रथम या प्रकरणाचा तपास केला आणि जुलै 2020 मध्ये त्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, विवेकानंद रेड्डी स्वतःसाठी किंवा जगन मोहन रेड्डी यांची बहीण शर्मिला किंवा आई वाय.एस. विजयम्मा यांच्यासाठी कडप्पा लोकसभा मतदारसंघातून तिकीट मागत होते.
गेल्या ४८ तासांत सीबीआयने या प्रकरणात दुसरी अटक केली आहे. यापूर्वी कडप्पाचे खासदार वायएस अविनाश रेड्डी यांनाही सीबीआयने शुक्रवारी अटक केली होती. आज सकाळी सीबीआयचे पथक वायएस भास्कर रेड्डी यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. यानंतर अटकेचे निवेदन कुटुंबीयांना देण्यात आले. भास्कर रेड्डी यांना अटक केल्यानंतर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने घराबाहेर जमले. सीबीआयच्या पथकाने भास्कर रेड्डी यांची यापूर्वीही अनेकदा चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या हत्येसाठी ४० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण हैदराबाद सीबीआय न्यायालयात पाठवले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.