Gulabrao Patil News : शिंदे गटाच्या मनात चाललंय काय? शिवतारेंनंतर गुलाबरावांचंही अजितदादांविषयी मोठं विधान

Maharshtra Politics : अजित पवार हीच राष्ट्रवादी...
Gulabrao Patil News
Gulabrao Patil NewsSarkarnama

Jalgaon News : शिंदे गटाचे नेते व मंत्री गुलाबराव पाटील हे त्यांच्या रोखठोक व हटके वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाजप शिवसेना युतीत येणार असल्याच्या चर्चांवर मोठं विधान केलं आहे.

गुलाबराव पाटील(Gulabrao Patil) हे जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांविषयी सूचक वक्तव्य केलं आहे. पाटील म्हणाले, अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. त्यामुळं ते जे बोलतील तोच आमदारांचा आकडा त्यांच्यासोबत असेल. अजित पवारांसोबत बरेच आमदार असून कोणतेही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते.

Gulabrao Patil News
Atique Ahmed news: आतिक आणि अश्रफची हत्या का केली? हल्लेखोरांनी सांगितलं धक्कादायक कारण...

मात्र, त्यासाठी अजून कुळ बघावं लागेल. गुण जुळवावे लागतील. नंतरच ते काम करावं लागेल असे सूचक वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे. पाटलांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अजित पवारां(Ajit Pawar)च्या भाजप शिवसेना युतीतील प्रवेशाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा खळबळजनक दावा, महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या घोटाळ्यातून ईडीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अजित पवारांचं नाव वगळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पवारांच्या भाप शिवसेना युतीतील प्रवेशाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. याचवेळी आता शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनीही अजित पवारांविषयी सूचक वक्तव्य केलं आहे.

Gulabrao Patil News
Imtiaz Jalil On Atique, Ashraf Shot Dead : अतिक, अश्रफच्या हत्येनंतर इम्तियाज म्हणाले, जंगलराजमध्ये तुमचे स्वागत..

...तर महाराष्ट्राचा राजकारण सोप्प होईल!

शिवसेनेचे नेते विजय शिवतारे म्हणाले,अजित पवारांनी आम्हाला सपोर्ट केल्यानंतर पुरंदरच काय तर महाराष्ट्राचा राजकारण सोप्प होईल असं विधान करत राज्याच्या राजकारणात एखच खळबळ उडवून दिली आहे. चांगले लोक एकत्र आल्यावर देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने चांगले दिवस नक्कीच येतील असंही शिवतारे यावेळी म्हणाले.

''अजित पवार असं काही करणार नाहीत..''

अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं होतं. यावर बोलताना पटोले म्हणाले की, अजित पवार असं काही करणार नाहीत हा आमचा आहे. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. भाजपविरोधी जे पक्ष आहेत त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. ही वैचारीक लढाई असल्याचे पटोले म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com