Chief Minister Sarkarnama
देश

UP Politics : शंभर आमदार आणा, CM बना! भाजपची सत्ता उलथविण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना खुली ऑफर, माजी मुख्यमंत्र्यांनी उडवून दिली खळबळ

00 MLA offer UP : अखिलेश यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडले.

Rajanand More

BJP government News : देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशाच्या राजकारणात सध्या सातत्याने उलथापालथ होत आहे. राज्यात पुढीलवर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत झटका बसल्याने भाजपकडून सावध पावले टाकली जात आहेत. तर समाजवादी पक्ष भाजपला पुन्हा धक्का देण्याची रणनीती आखत आहे.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांना थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर देत खळबळ उडवून दिली आहे. मुख्यमंत्री उत्तर प्रदेशाच्या जमिनीवर आज बाहेर जात आहेत. ज्या दोन लोकांना मुख्यमंत्री बनायचे आहे, त्यांनी १०० आमदार घेऊन यावे आणि आमदार बनावे, अशी ऑफरच यादव यांनी दिली.

अखिलेश यादव एवढ्यावर थांबले नाहीत. ही ऑफर एक आठवड्यांसाठी आहे. आधीच केशव प्रसाद मौर्य यांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली आहे. चला पुन्हा एकदा देतो. यापेक्षी चांगली ऑफर त्यांना कुठेही मिळणार नाही,  असेही यादव यांनी म्हटले आहे. आधी केवळ मौर्य यांना ऑफर देणाऱ्या यादव यांनी ब्रजेश पाठक यांनाही आपल्या यादीत घेतले आहे.

यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवरही जोरदार टीकास्त्र सोडले. ते विकासावर मते मागत नाहीत. ते विकासाचा द्वेष करतात. गोमती नदीच्या पाण्यावरून गंभीर चर्चा होत आहे. वृत्तपत्रांमध्ये चर्चा होतेय. गोमतीतील पाणी दुषित झाल्याने खूप लोक आजारी पडले आहेत. इतर आजार येत आहेत. हिंडन नदी स्वच्छ करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे, अशी टीका यादव यांनी केली.

जमिनीखालून पाण्यासाठी पाईपलाईन टाकली जात आहे. ही पाईपलाईन भ्रष्टाचाराची आहे. बुंदेलखंडवरून पाईलपाईन थेट लखनौला जाणार आहे. मुख्यमंत्री जपानला जात आहेत, पण क्योटो जात नाहीत. बुलेट ट्रेन एक कोटींची होती. आता ती दोन कोटींची झाली आहे, अशी टीकाही यादव यांनी उत्तर प्रदेश सरकारवर केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT