Pramod Sawant won | CM Pramod Sawant news | Goa Election result 2022 news  
देश

Goa Election result अखेर प्रमोद सावंत जिंकले...

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) साखळी मतदार संघातून बहुमताने विजय मिळवला आहे, तर काँग्रेस उमेदवार धर्मेश सगलानी पराभूत झाले आहेत. मुख्यमंत्री प्रमुख सावंत हे साखळी मतदारसंघातून या विधानसभा निवडणुकीसाठी उभे होते. मतमोजणीच्या पहिल्या काही टप्प्यांमध्ये ते पिछाडीवर होते, त्यामुळे भाजपची धाकधुक वाढली होती. तर धर्मेश सगलानी हे आघाडीवर होते. पण पुढील टप्प्यांमध्ये मुख्यमंत्री सावंत यांनी आघाडी घेत आता विजय मिळवला आहे. (CM Pramod Sawant news)

मुख्यमंत्री सावंत यांच्यासह गोव्याचे आरोग्यमंत्री आणि वाळपई मतदार संघाचे भाजपचे उमेदवार विश्‍वजित राणे यांनीही 8300 मतांनी विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. 'गोव्यातल्या जनतेने घोटाळा करणाऱ्यांना नकार देत पुन्हा एकदा भाजप सरकारला संधी देण्याचे ठरवले,' असल्याचे मत विश्वजित राणे यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर फातोर्डा मतदारसंघाचे उमेदवार विजय सरदेसाई 1300 मतांनी विजयी झाले आहेत. (Goa Election result 2022 news updates)

गोवा विधानसभा निवडणूक निकालात चढ-उतार दिसून येत असून पहिल्या टप्प्यात पिछाडीवर असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत चौथ्या फेरीअखेर आघाडीवर आले आहेत. सुरुवातीला ४३६ मतांनी पिछाडीवर असलेले सावंत यांनी चौथ्या फेरीनंतर तब्बल ६०५ मतांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, विश्वजित राणे आणि दिव्या राणे यांनी निवडणूक जिंकली आहे.याचसोबत पणजीतून बाबूश मोन्सेरात, ताळगावातून जेनिफर मोन्सेरात तसेच वाळपईतून विश्वजित राणे यांच्यासह व पर्येतून दिव्या राणे यांचाही विजय जवळपास निश्चित झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT