Goa Election result : गोव्यात विश्वजित राणे आणि पत्नी दिव्या राणेंचा जलवा

Goa Election result गोवा विधानसभा निवडणूक निकालात चढ-उतार दिसून येत असून पहिल्या टप्प्यात पिछाडीवर असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत चौथ्या फेरीअखेर आघाडीवर आले आहेत.
Goa Election result| Vishwajit Rane|
Goa Election result| Vishwajit Rane|
Published on
Updated on

पणजी : गोव्यात भाजपच्या दोन उमेदवारांनी बहुमतांनी विजय मिळवला आहे. फातोर्डा मतदारसंघाचे उमेदवार विजय सरदेसाई 1300 मतांनी विजयी झाले आहेत. तर वाळपई मतदार संघाचे भाजपचे उमेदवार विश्‍वजित राणे यांनीही 8300 मतांनी विधानसभा निवडणुकीमध्ये विजयी झाले आहेत. 'गोव्यातल्या जनतेने घोटाळा करणाऱ्यांना नकार देत पुन्हा एकदा भाजप सरकारला संधी देण्याचे ठरवले,' असल्याचे मत विश्वजित राणे यांनी व्यक्त केले आहे.

गोवा विधानसभा निवडणूक निकालात चढ-उतार दिसून येत असून पहिल्या टप्प्यात पिछाडीवर असलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत चौथ्या फेरीअखेर आघाडीवर आले आहेत. सुरुवातीला ४३६ मतांनी पिछाडीवर असलेले सावंत यांनी चौथ्या फेरीनंतर तब्बल ६०५ मतांची आघाडी घेतली आहे. दरम्यान, विश्वजित राणे आणि दिव्या राणे यांनी निवडणूक जिंकली आहे.याचसोबत पणजीतून बाबूश मोन्सेरात, ताळगावातून जेनिफर मोन्सेरात तसेच वाळपईतून विश्वजित राणे यांच्यासह व पर्येतून दिव्या राणे यांचाही विजय जवळपास निश्चित झाला आहे.

Goa Election result| Vishwajit Rane|
Goa election : फडणवीसांचे परफेक्ट नियोजन, कॉग्रेसचा 'करेक्ट' कार्यक्रम

गोवा विधानसभा निवडणूक निकालात भारतीय जनता पक्ष १९ जागांवर, तर काँग्रेस १० जागांवर, महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्ष चार जागांवर आघाडीवर आहे. अपक्ष ३ जागी आघाडीवर आहेत. साखळी मतदारसंघामधून मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पहिल्या टप्पात पिछाडीवर पडले होते. या ठिकाणी धर्मेश सगलांनी यांनी आघाडी घेतली होती.

मात्र, चौथ्या फेरीअखेर प्रमोद सावंतांनी सगलांनी यांना पिछाडीवर ढकलत आघाडी घेतली आहे. ते सध्या ६०५ मतांनी आघाडीवर आहेत. भाजप 19 मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे, काँग्रेस 10 मतदार संघातून आघाडीवर आहेत, मगो 4 मतदारसंघातून, अपक्ष उमेदवार 3 मतदारसंघातून आघाडीवर आहेत. मडगावमधून दिगंबर कामत हे 5849 मतांनी पुढे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com