Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मराठी माणसांसाठी गुवाहाटीतून मोठी घोषणा

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra CM Eknath Shinde : आसाममध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन' उभारण्यात येणार आहे, तर महाराष्ट्रातही आसाम भवन उभारण्यात येणार आहे, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतून केली.

महाराष्ट्र (Maharashtra) आणि आसाम (Asaam) या दोन राज्यांच्या संस्कृतीमध्ये अनेक साम्यस्थळं आहेत, त्यामुळे ही दोन राज्य सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ यावी, यासाठी ही घोषणा करण्यात आली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

आसाममध्ये सेवा बजावणाऱ्या मराठी भाषी राजपत्रित अधिकाऱ्यांनी आसाममध्ये सांस्कृतिक भवन उभारावं, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटून केली होती. मुख्यमंत्र्यांनी याची तात्काळ दखल घेत त्यांची मागणी मान्य केली. मुख्यमंत्री सध्या कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आपल्या आमदार, खासदारांसह गुवाहाटी दौऱ्यावर आहेत. (Eknath Shinde In Asaam)

आसामच्या प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक महाराष्ट्रातून येतात. यावेळी त्यांना सोयी सुविधा पुरवणे, महाराष्ट्रातून आलेल्या नागरिकांना पाहिजे ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज मंडळ प्रयत्नशील असते. मात्र महाराष्ट्रातून आसाममध्ये येणाऱ्या भाविकांसाठी सांस्कृतिक भवनाची गरज जाणवल्याने त्यांनी आसाममध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन' उभारण्याची घोषणा केली.

दरम्यान, महाराष्ट्रातून आसाममध्ये जाणाऱ्या किंवा आपल्या नोकरीनिमित्त आसाममध्ये असणाऱ्या मराठी माणसासाठी 'छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवनाचा (Chhatrapati Shivaji Maharaj Sanskrutik Bhavan) मोठा फायदा होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT