नाशिक : शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातलं काटशहाचं राजकारण संपताना दिसत नाही. आता नाशिकमधून एक मोठी अपडेट समोर येत आहे. शिंदे गट पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. नाशिक महापालिकेच्या ठाकरे गटातील १२ ते १५ नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या चर्चा आहे. मात्र शिंदे गट अफवा पसरवत असल्याचे ठाकरे गटाने म्हंटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये शिंदे गट हा ठाकरे गटाला जोर का झटका देणार असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटातील तब्बल १२ नगरसेवक नाशिकमधून मुंबईकडे रवाना होतील. ते मुख्यमंत्री यांच्या निवास्थानी दाखल होतील. मुख्यंत्र्यांच्या हस्ते त्यांचा शिंदे गटात प्रवेश होईल,अशी सूत्रांची माहिती आहे.
पुढील काळात राज्यात मुंबसह, ठाणे, पुणे, औरंगाबाद आणि नाशिक या महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या महापालिकांवर आपलीसत्ता राहावी, यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरूवात केली आहे. नाशिक या महत्त्वपूर्ण पालिकेत सत्ता आणण्यात ठाकरे गटाने जोरदारतयारी केली होती. मात्र, आता ठाकरे गटाच्या या प्रयत्नांना सुरूंग लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.