India China Relation Sarkarnama
देश

India Vs China : चीनचा स्ट्राईक, पुन्हा तणाव वाढणार; महिलेला ताब्यात घेत थेट भारतातील राज्यावरच उघडपणे सांगितला हक्क

China Foreign Ministry Mao Ning statement : चीनच्या अधिकाऱ्यांनी अरूणाचल प्रदेशवरच आक्षेप घेत हा भाग चीनचा असल्याचा दावा केला होता.

Rajanand More

Arunachal Pradesh woman detained in China : चीनने पुन्हा एकदा कुरापती करण्यास सुरूवात केली आहे. शांघाय विमानतळावर चार दिवसांपूर्वी एका महिलेला ताब्यात घेऊन त्रास दिल्याचे प्रकरण सध्या दोन्ही देशांमधील तणावाचे कारण बनले आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर भारताने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर चीनमधील अधिकाऱ्यांनी खळबळजनक दावा केल्याने दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

नेमकं काय घडलं?

यूकेमध्ये राहणारी एक भारतीय महिला नागरिक पेमा वांगजोम थोंगडोक यांनी नुकतीच सोशल मीडियात एक पोस्ट केली होती. यामध्ये त्यांनी दावा केला होता की, त्या २१ नोव्हेंबर रोजी त्या लंडनमधून जपानकडे निघाल्या होत्या. शांघाय विमानतळावर आल्यानंतर तेथील इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पेमा यांचा पासपोर्ट अवैध ठरवला. या पासपोर्टवर त्यांचे जन्मठिकाणी अरूणाचल प्रदेश असे लिहिले होते.

चीनच्या अधिकाऱ्यांनी अरूणाचल प्रदेशवरच आक्षेप घेत हा भाग चीनचा असल्याचा दावा केला होता. पीडिते महिलेने पोस्टमध्ये भारतीय परराष्ट्र मंत्रालय, मंत्री किरेन रिजिजू आणि मुख्यमंत्री पेमा खांडू यांना टॅग करत अरूणाचल प्रदेश चीनचा हिस्सा आहे का, असा सवाल केला होता. त्यावर भारताने कडक भूमिका घेत चीनला खडसावले होते.

महिलेला ताब्यात घेण्याचे चीनने दिलेले कारण भारताने फेटाळून लावले होते. अरूणाचल भारताचाच अविभाज्य भाग असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते. भारताने तीव्र शब्दांत खडसावल्यानंतर चीनचीही प्रतिक्रिया आली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी वादग्रस्त विधान केले आहे. जांगनान (चीनने अरूणाचल प्रदेशला दिलेले नाव) हे चीनचे क्षेत्र आहे.

भारताने बेकायदेशीरपणे स्थापन केलेल्या अरूणचाल प्रदेशला चीनने कधीच मान्यता दिलेली नाही, असा खळबळजनक दावा चीनने केला आहे. त्याचप्रमाणे संबंधित महिलेच्या प्रकरणाबाबत चौकशी सुरू आहे. अधिकाऱ्यांनी कायदा आणि नियमानुसारच चौकशी प्रक्रिया पूर्ण केल्याचेही प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT