BJP Politics : बिहारचं मैदान मारणाऱ्या भाजपची प्रतिष्ठा दिल्लीत पणाला; मंत्री, खासदार, आमदारांची मोर्चेबांधणी, तरीही भीती?

BJP Bihar election victory : दिल्लीमध्ये सत्ता आल्यानंतर आठ महिन्यांतच ही पोटनिवडणूक होत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोणतीही निवडणूक प्रतिष्ठेची बनते.
Amit Shah Narendra Modi
Amit Shah Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

BJP prestige at stake in Delhi : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळविला. राज्यात पहिल्यांदाच भाजप 89 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. बिहारमध्ये पुन्हा सत्ता काबीज करण्यात यश मिळविणाऱ्या भाजपची प्रतिष्ठा मात्र दिल्लीत पणाला लागली आहे. दिल्लीमध्ये महापालिकेच्या 12 जागांसाठी पोटनिवडणूक होत असली तरी ही निवडणूक मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या टीमची अग्निपरीक्षा ठरणार आहे.

दिल्लीत भाजपची २७ वर्षांनंतर सत्ता आली आहे. बिहार निवडणुकीनंतर दिल्लीतील पोटनिवडणुकीसाठी भाजपचे मनोबल वाढले आहे. भाजपसमोर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचे आव्हान आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी निवडणूक जिंकण्यासाठी आमदार, मंत्र्यांना मैदानात उतरविले आहे. त्या स्वत: मतदारसंघ पिंजून काढत आहेत. त्यामागे कारणही तसंच आहे. दिल्लीतील दक्षिणपुरी, संगम विहार-ए, ग्रेटर कैलाश, विनोद नगर, शालीमार बाग-बी, अशोक विहार, चांदणी चौक, चांदणी महल, द्वारका-बी, मुंडका, नारायणा आणि दिचाऊ कला या मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

निवडणूक होत असलेल्या मतदारसंघांपैकी शालीमार बाग-बी हा रेखा गुप्ता यांचा मतदारसंघ आहे. मुख्यमंत्री होण्यापूर्वी त्या या मतदारसंघाच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे या मतदारसंघात त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याचप्रमाणे द्वारका-बी जागेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून नगरसेवक म्हणून निवडून आलेले कमलजीत सहरावत हे पश्चिम दिल्ली लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार आहेत. या दोघांच्या राजीनाम्यामुळे पोटनिवडणूक होत आहे.

Amit Shah Narendra Modi
Nitish Kumar News : नितीश कुमारांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये पुढच्या टर्मचं मुख्यमंत्रिपदही केलं फिक्स; काय घडलं?

इतर मतदारसंघातील नगरसेवकांनी आमदार म्हणून निवडून आल्याने राजीनामे दिले आहेत. यापूर्वी १२ पैकी ९ मतदारसंघात भाजपचे तर उर्वरित तीन मतदारसंघात आपचे आमदार होते. त्यामुळे भाजपने किमान ९ मतदारसंघात पुन्हा विजय मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या सर्व मंत्र्यांना वार्ड निवडणूक प्रभारी बनविले आहे. प्रत्येक मंत्र्याकडे दोन वॉर्डांची जबाबदारी देण्यात आली आहे. मतदारसंघ पिंजून काढण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.  

Amit Shah Narendra Modi
CJI Surya Kant : लष्कर धर्मनिरपेक्षच! CJI सुर्य कांत यांचा पहिला महत्त्वपूर्ण निकाल, सुप्रीम कोर्टाचा बडतर्फ अधिकाऱ्याला झटका!

दिल्लीमध्ये सत्ता आल्यानंतर आठ महिन्यांतच ही पोटनिवडणूक होत आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये कोणतीही निवडणूक प्रतिष्ठेची बनते. त्यामुळे एकाचवेळी 12 मतदारसंघात निवडणूक होत असल्याने भाजपसाठी अग्निपरीक्षा मानली जात आहे. तर दुसरीकडे आपने ताकद लावली आहे. दिल्लीत अजूनही आपली ताकद असल्याचे दाखवून देण्याची संधी आपकडे आहे. तर पुन्हा विजयी पताका फडकविण्यासाठी सज्ज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com