नवी दिल्ली : चिनी सैन्याने अरूणाचल प्रदेशात (Arunachal Pradesh) भारताच्या हद्दीत घुसून मिरान तारोन या भारतीय तरुणाचे अपहरण केले होते. काही दिवसांनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) या तरुणाला भारतीय लष्कराच्या (Indian Army) ताब्यात दिले होते. अखेर त्या तरुणाची कुटुंबीयांशी भेट झाली होती. आता चीनच्या ताब्यात असताना या तरुणाचा अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मिराम तारोनचे (Miram Taron) पिता ओपांग तारोन यांनी या प्रकरणी आता खळबळजनक खुलासा केला आहे. मिराम हा मानसिकदृष्ट्या खचला असून, या घटनेमुळे तो घाबरला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, मिरामला आठवड्यापेक्षा अधिक काळ डोळे बांधून ठेवण्यात आले होते. तो अजूनही मानसिक धक्क्यात आहे. त्याला अनेक वेळा लाथांनी मारहाण करण्यात आली होती. याचबरोबर त्याला शॉकही देण्यात आला होता. त्याला बांधून ठेवण्यात आले होते. केवळ जेवण्यासाठी त्याचे हात मोकळे केले जात असत.
जिदो गावांतील 17 वर्षीय मिराम तारोन याचे भारतीय (India) हद्दीतील लुंगटा जोर क्षेत्रातील बिशिंग गावातून 18 जानेवारीलाअपहरण झाले होते. हा भाग अरूणाचल प्रदेशातील अपर सियांग जिल्ह्यातील आहे. चीनने 2018 मध्ये भारताच्या सीमेवर 3 ते 4 किमोमीटर रस्ता तयार केला होता. तिथूनच तरूणांच अपहरण केल्याचे सांगितले जात होते. त्याचा एक मित्र चिनी सैन्याच्या तावडीतून निसटल्यानंतर त्याने अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली होती. भाजपचे अरूणाचल प्रदेशमधील खासदार तापिर गाओ (Tapir Gao) यांनी ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून दिली होती.
भारतीय लष्कराने पीएलएशी संपर्क साधत या घटनेबाबत माहिती दिली होती. हा तरुण वनौषधी गोळा करण्यासाठी गेला होता. पण तो परत आला नव्हता. या तरुणाच शोध लागलेला नाही. पीएलएने आपल्या भागात या तरुणाचा शोध घेवून प्रोटोकॉलनुसार भारताला सोपवावे, असे भारतीय लष्कराने पीएलएला कळवले होते. पीएलएने या तरुणाला अखेर 27 जानेवारीला भारतीय लष्कराच्या ताब्यात दिले होते. त्यावेळी त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.