CJI Bhushan Gavai  Sarkarnama
देश

Former CJI Bhushan Gavai : राजकारणात येण्याबाबतच्या माजी CJI गवईंच्या विधानाने चर्चांना उधाण; कधी, कोणता पक्ष?

CJI Gavai says won’t accept government post : सोशल मीडियातून अनेकांनी भूषण गवई यांच्याविषयी हिंदू विरोधी अशी मते व्यक्त केली होती. त्यावर बोलताना आज त्यांनी आपल्याला हिंदूविरोधी म्हणणे चुकीचे असल्याचे सांगितले.

Rajanand More

Ex CJI Bhushan Gavai retirement plans : माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर मोठं विधान केले आहे. निवृत्तीनंतर आपण राज्यसभा खासदार, राज्यपाल किंवा कोणत्याही आयोगाचे पद स्वीकारणार नसल्याचे त्यांनी यापूर्वीच जाहीर केले होते. त्याचा पुनर्रचार करताना माजी सरन्यायाधीशांनी राजकारणात येण्याबाबत मात्र सूचक विधान केल्याने आता चर्चांना उधाण आले आहे.

सरन्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यानंतर भूषण गवई यांनी मंगळवारी दिलेल्या मुलाखतीत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. निवृत्तीनंतरचा प्लॅन, बुलडोझर जस्टिस, न्यायव्यवस्थेतील भ्रष्टाचार, सोशल मीडियावरील बंधने, समाजात वाद निर्माण करणारी भाषणे, सुप्रीम कोर्टातील बूटफेक प्रकरण, कॉलेजियमचे कामकाज आदी मुद्द्यांवर त्यांनी परखडपणे आपली भूमिका मांडली.

मुलाखतीमध्ये माजी सीजेआय गवई यांना राजकारणात येण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यांचे वडील रा. सू. गवई मोठे राजकीय नेते होते. विधान परिषदेचे अनेक वर्षे आमदार, विरोधी पक्षनेते, लोकसभेसह राज्यसभेचे खासदार तसेच राज्यपाल अशी महत्वाचे पदे त्यांनी भूषविली होती. यापार्श्वभूमीवर गवई यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी ठोस उत्तर दिले नाही.

राजकारणात येणार नाही, असेही माजी सरन्यायाधीशांनी ठामपणे सांगितले नाही. त्यामुळे आता ते राजकारणात येणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण येणार आहे. मात्र, यावेळी त्यांनी अजूनतरी राजकारणात येण्याबाबत विचार केलेला नाही, असे सांगताना राज्यपाल किंवा नामनिर्देशित राज्यसभा खासदार होणार नसल्याचे ठामपणे सांगितले.

हिंदू विरोधी म्हणणे चुकीचे

एका प्रकरणाच्या सुनाणीदरम्यान माजी सरन्यायाधीश गवई यांच्या एका विधानावरून वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियातून अनेकांनी त्यांच्याविषयी हिंदू विरोधी अशी मते व्यक्त केली होती. त्यावर बोलताना आज त्यांनी आपल्याला हिंदूविरोधी म्हणणे चुकीचे असल्याचे सांगितले. बूट फेकण्याच्या घटनेनंतर आपण कोर्टात विधाने करण्याबाबत सतर्क झाल्याचेही त्यांनी सांगितले.

सोशल मीडियात आपली विधाने चुकीच्या पध्दतीने सादर कऱण्यात आली. पण या प्रकरणाचा आपल्यावर कोणताही परिणाम झाला नाही. बूट फेकण्याच्या घटनेमागे कोणताही हेतू होता, हे माहिती नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. हेट स्पीचवर बोलताना ते भूषण गवई म्हणाले, अशी विधाने रोखण्यासाठी ठोस कायदा आणायला हवा. अशी विधाने समाजामध्ये फूट पाडतात. त्याविरोधात कडक कायदा असायला हवा, अशी अपेक्षी त्यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT