CJI D.Y. Chandrachud
CJI D.Y. Chandrachud Sarkarnama
देश

CJI D.Y. Chandrachud News : ''सुनावणीदरम्यान नोंदवलेली निरीक्षणं निकालात येतातच असे नाही''

सरकारनामा ब्यूरो

Supreme Court News : न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान, विचारलेल्या प्रश्नावरुन अनेकदा तसा निकाल येईल, असा लोकांचा समज होतो. मात्र, सुनावणी दरम्यान न्यायालयात नोंदवलेली निरीक्षणं किंवा विचारलेल्या प्रश्नावरुन तसाच निकाल येईल, असे नाही, असे स्पष्ट मत देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI D.Y. Chandrachud) यांनी मांडले.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड एका माध्यम समुहाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते म्हणाले, अनेकदा न्यायालयात विषयाचे गांभीर्य समजून घेण्यासाठी प्रश्न विचारलेले असतात. त्या विषयाची अधिक माहिती व्हावी, ती व्यवस्थीत पणे समजून घेता, यावी यासाठी प्रश्न विचारलेले जातात. मात्र, निकाल त्याच पद्धतीने येईल, असे नसते. विचारलेल्या प्रश्नावरुन निकाल येईल, असे लोक ठरवतात, ते चुकीचे आहे, असेही सरन्यायाधीश म्हणाले.

या वेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. सर्वोच्च न्यायालयाला (Supreme Court) असलेल्या सुट्यांवरही त्यांनी भाष्य केले. अनेकदा न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवरून प्रश्न विचारले जातात, न्यायालयाच्या सुट्ट्यांवर बोलले जाते. न्यायालयाला सुट्या खूप असतात, यावर सरन्यायाधीशांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, न्यायाधीश वर्षातले २०० दिवस काम करतात. ते सुट्टीवर असले तरी त्यांच्या डोक्यात न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे आणि कायदे हेच सगळे सुरू असते. थोडाफार वेळ मिळतो त्यातही ते त्यांच्या कामाचाच विचार करतात.

न्यायाधीश आठवड्याचे सातही दिवस काम करत असतात. सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत न्यायालयातील न्यायाधीश हे दररोज ५० ते ६० प्रकरणे ऐकतात. अनेक प्रकरणावरील निर्णय राखून ठेवले जातात. शनिवारी न्यायाधीश त्यांचे निर्णय लिहिण्यात व्यस्त असतात. रविवारी ते सोमवारची तयारी करत असतात. जगभरातील इतर देशांमधील सर्वोच्च न्यायालयात कसे काम चालते आणि भारतातले काम कसे चालते यातला फरकदेखील यावेळी सरन्यायाधीशांनी सांगितला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT