Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? असीम सरोदे म्हणाले...

Supreme Court News : मागील नऊ महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु होती.
Asim Sarode, Supreme Court
Asim Sarode, Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : मागील नऊ महिन्यांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु होती. ती सुनावणी गुरुवारी संपली. अनेक दिवस युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखीव ठेवला. या प्रकरणात काय निकाल येईल, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. या सुनावणीसंदर्भात अॅड. असीम सरोदे (Adv. Asim Sarode) यांनी आपले मत व्यक्त केले.

ते एका मुलाखतीमध्ये बोलत होते. या वेळी असीम सरोदे म्हणाले, ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पाहताना आणि सरन्यायाधीशांनी जेव्हा तुषार मेहता यांना अनेक प्रश्न विचारले तेव्हा ही केस फक्त राज्यातील सत्तासंघर्षाच्या निगडित राहिली नसून ती भारतीय लोकशाही वाचवण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Asim Sarode, Supreme Court
Rajinikanth News : रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा; फोटो शेअर करत आदित्य म्हणाले…

उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? या प्रश्नावर असिम सरोदे म्हणाले, युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर अनेक शक्यता वर्तवल्या गेल्या आहेत. त्यावर चर्चा करत असताना ते म्हणाले की राज्यपालांनी तटस्थ भूमिका घेणे अपेक्षित आहे. मात्र, तसे राज्यपाल वागले नाही. शिंदे जेव्हा बाहेर पडले तेव्हा राज्यपालांनी त्यांना शिवसेना नेते म्हणून शपथ दिली. मात्र, राज्यपालांना पक्ष म्हणून मान्यता देण्याचे अधिकार नाही.

त्या मुळे अशा परिस्थितीमध्ये पूर्ववत परिस्थिती करण्याचे सर्वोच्च न्यायालयाला अधिकार आहे. जर न्यायालयाने परिस्थिती पूर्ववत करायचे ठरवले तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) काही काळासाठी मुख्यमंत्री बनू शकतात. त्यानंतर पुन्हा सभागृहात बहुमत चाचणी होऊ शकते. अशी एक शक्यता असल्याचे असे मत सरोदे यांनी व्यक्त केले आहे.

Asim Sarode, Supreme Court
Pankaja Munde : गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचे अनावरण; फडणवीसांना निमंत्रण नाही; पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले!

या प्रकरणामध्ये अनेक बाजू असल्या तरी न्यायालयाकडून थेट शिंदेंना अपात्र ठरवले जाऊ शकत, अशी एक शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, असा निर्णय येण्याची शक्यता कमी आहे, असे मत सरोदे यांनी व्यक्त केले आहे. सर्वोच्च न्यायालय विधीमंडळामध्ये हस्तक्षेप केला जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे थेट न्यायालयाकडून शिंदे यांना अपात्र ठरवले जाईल याची शक्यता कमीच आहे. विधानसभेतला प्रश्न विधानसभेतच सोडवला जावा, असे न्यायालयाकडून सांगण्यात येईल, अशी शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com