CJI Surya Kant Sarkarnama
देश

Supreme Court news : धक्कादायक बातमी : कोर्टाच्या आदेशानंतर थेट सरन्यायाधीशांच्या भावाला फोन; CJI सूर्य कांत भडकले, मला धमक्या, असे धाडस...

CJI Surya kant news, contempt of court india case : बुधवारी कोर्टात हे प्रकरण पुन्हा सुनावणीला आल्यानंतर CJI सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली.

Rajanand More

Supreme Court case update india : सुप्रीम कोर्टात बुधवारी सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी धक्कादायक प्रकार सांगितला. वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशाशी संबंधित एका प्रकरणाशी संबंधित याचिकाकर्त्याच्या वडिलांनी कोर्टाच्या एका आदेशानंतर थेट सरन्यायाधीशांच्या भावाला फोन केल्याचे समोर आले आहे. त्यांनी कोर्टात याबाबत माहिती देताना संबंधितांना चांगलेच सुनावले.

खुल्या प्रवर्गातील दोन विद्यार्थ्यांनी बौध्द धर्मात धर्मांतर केल्यामुळे त्यांना बुध्दिस्ट मेडिकल कॉलेजमध्ये अल्पसंख्यांक कोट्यातून प्रवेश मिळावा, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर जानेवारी महिन्यात याप्रकरणी सुनावणी झाली होती. त्यावेळी त्यांनी धर्मांतराबाबत साशंकता व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या अल्पसंख्यांक प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

‘लाईव्ह लॉ’ने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी कोर्टात हे प्रकरण पुन्हा सुनावणीला आल्यानंतर CJI सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्यांच्या वकिलाला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तुमच्या अशिलाच्या वडिलांविरुद्ध अवमान कारवाई का केली जाऊ नये, असा सवाल करत सरन्यायाधीश म्हणाले, त्यांनी माझ्या भावाला फोन केला. सरन्यायाधीशांनी हा आदेश कसा दिला, याविषयी विचारण्याचे धाडस त्यांनी कसे केले? माझ्यावर ते हुकूम गाजविणार का, असा सवाल सीजेआय सूर्यकांत यांनी केला.  

आधी तुम्ही याची खात्री करा आणि वकील म्हणून या खटल्यातून माघार घ्यायला हवी. तुमचा अशील तर गैरवर्तन करत असताना तुम्ही असे करणे भाग आहे. तो भारताबाहेर जाऊन लपला, तरी अशा प्रकारच्या लोकांना कसे ताळ्यावर आणायचे, हे मला माहिती आहे, असा इशारा सरन्यायाधीशांनी दिला.

मला धमक्या देण्याचे धाडस पुन्हा कधीही करू नका. मी हा खटला दुसऱ्या न्यायालयात वर्ग करेन, असे तुम्हाला वाटत असेल. पण गेल्या २३ वर्षांपासून मी अशा प्रकारच्या प्रवृत्तींचा सामना करत असल्याचेही सांगत सरन्यायाधीश सूर्य कांत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आपल्याला या प्रकाराबाबत माहिती नसल्याचे सांगत कोर्टाची माफी मागितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT