Congress Office Eviction Notice : काँग्रेसला सरकारकडून मोठा झटका; अधिवेशन सुरू असतानाच दिल्लीतील ऐतिहासिक मुख्यालय सोडण्याची नोटीस

Estate department notice: इस्टेट विभागाकडून काँग्रेस पक्षाला ही जागा मुख्यालयासाठी देण्यात आली होती. काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी नवे कार्यालय इंदिरा भवन हे कार्यालय उभारले आहे.
government eviction notice to Congress headquarters Delhi
government eviction notice to Congress headquarters DelhiSarkarnama
Published on
Updated on

Congress party office Delhi : काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. दिल्लीतील अकबर रोडवरील मुख्यालय रिकामे करण्याची नोटीस पक्षाला इस्टेट डिपार्टमेंटने बजावली आहे. त्यानुसार काँग्रेसला २८ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मागील तब्बल ४८ वर्षांपासून हे कार्यालय काँग्रेसचे मुख्यालय राहिले आहे. याच कार्यालयातून अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. आता पक्षाला हे कार्यालय सोडावे लागणार आहे.

दिल्लीतील २४ अकबर रोड येथील काँग्रेसचे मुख्यालय अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिले आहे. इस्टेट डिपार्टमेंटने या कार्यालयासह दिल्लीतीलच ५ रायसीना रोड परिसरातील युवक काँग्रेसचे मुख्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. ही दोन्ही कार्यालये २८ मार्चपर्यंत सोडावी लागणार आहेत. संसदेचे अधिवेशन सुरू असतानाच ही नोटीस आल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे.

नेमकं कारण काय?

इस्टेट विभागाकडून काँग्रेस पक्षाला ही जागा मुख्यालयासाठी देण्यात आली होती. काँग्रेसने काही महिन्यांपूर्वी नवे कार्यालय इंदिरा भवन हे कार्यालय उभारले आहे. या कार्यालयाचे उद्घाटनही झाले आहे. आता नवे कार्यालय झाल्याने नियमानुसार पक्षाला जुने कार्यालय सोडावे लागणार आहे. मात्र, अजूनही पक्षाचे बहुतांश कामकाज जुन्याच कार्यालयातून चालविले जात आहे.

government eviction notice to Congress headquarters Delhi
Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा SC आरक्षण, संरक्षणाबाबत महत्वपूर्ण निकाल; धर्मांतर केल्यास पाणी सोडावे लागणार...

काँग्रेसला दीनदयाळ उपाध्याय मार्गावर नव्या कार्यालयासाठी जमीन देण्यात आली होती. त्यामुळे इस्टेट विभागाने खूप आधीच २५ अकबर रोड आणि ५ रायसीना रोड परिसरातील जागांचे काँग्रेससाठीचे आरक्षण रद्द केले होते. इस्टेट विभागाने त्यानुसार ही कार्यालये रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.

government eviction notice to Congress headquarters Delhi
PM Narendra Modi Speech : क्षणाक्षणाला स्थिती बदलतेय, प्रत्येक आव्हानासाठी सज्ज राहा! देशात इंधनाचा साठा किती? PM मोदींनी दिली माहिती...

पक्षाला २८ मार्चपर्यंत ही कार्यालये रिकामी करावी लागणार आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून याविरोधात कोर्टात धाव घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोर्टातून नोटिशीला स्थगिती मिळविण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न केला जाऊ शकतो. तसेच सध्याचे मुख्यालय असलेला बंगला एखाद्या खासदाराला अलॉट व्हावा, यासाठीही प्रयत्न केले जाऊ शकतात. मात्र, तसे न झाल्यास पक्षाला हे ऐतिहासिक कार्यालय रिकामे करावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com