Abhijeet Dipke | Amit Shah Resignation Demand Sarkarnama
देश

Abhijeet Dipke : धर्मेंद्र प्रधाना यांच्यानंतर अभिजीत दीपकेंनी अमित शहांकडे मोर्चा वळवला; थेट राजीनाम्याची मागणी करत म्हणाले, "तुम्ही फेल..."

Amit Shah Resignation Demand : "जर सीजेपीला बाहेरून फंडिंग येतय, सीजेपी बाहेरून चालवण्यात येतंय तर मग माझ्या मनात असं येतं की, अमित शहा गृहमंत्री असताना हे कसं शक्य झालं? आणि जर हे असं असेल तर हे पूर्ण त्यांचं अपयश आहे. हे कसले चाणक्य आहेत मग? "

Jagdish Patil

Abhijeet Dipke's Amit Shah Resignation Demand : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधात झालेल्या बळाच्या वापराचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पण तिथे तो त्यांना बोलू दिलं नसल्याचा आरोप करत पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषद त्यांनी, "गृहमंत्र्यांना दिल्ली पोलिसांकडून सातत्यानं ब्रीफिंग दिली जात होती. मी स्वत: अमित शहांना पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोलताना पाहिल्याचा दावा केला. त्यामुळे दोनच शक्यता आहेत, एक तर गृहमंत्र्यांना कारवाईची माहिती होती किंवा मग त्यांना काहीच माहीती नव्हती. दोन्ही परिस्थितींमध्ये जबाबदारी निश्चित व्हायला हवी. पंतप्रधानांनी अमित शहांना पदावरून दूर करायला हवं, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

याच मुद्द्यावरून सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी थेट अमित शहांचा राजीनामा घ्यायला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. दीपके म्हणाले, "गोळीबार झाला त्याचे आदेश अमित शहांनी दिले होते, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे", असं मला वाटतं.

दरम्यान, यावेळी त्यांनी सीजेपीला परदेशातून फंडिंग होतं या मुद्द्यावरून देखील शहांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "जर सीजेपीला बाहेरून फंडिंग येतय, सीजेपी बाहेरून चालवण्यात येतंय तर मग माझ्या मनात असं येतं की, अमित शहा गृहमंत्री असताना हे कसं शक्य झालं? आणि जर हे असं असेल तर हे पूर्ण त्यांचं अपयश आहे, हे कसले चाणक्य आहेत?" असा सवाल दीपके यांनी उपस्थित केला.

तुम्ही असताना बाहेरून फंडिंग येत असेल तर स्वत: तुम्ही फेल झाला असून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी दीपके यांनी केली. तसंच यावेळी त्यांनी २० तारखेला जंतरमंतरवर जे दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांचं रक्त सांडलं ते देखील अमित शहांच्या ऑर्डरशिवाय झालेलं नाही, असा दावा देखील दीपके यांनी यावेळी केला आहे. त्यामुळे आता धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दीपके यांनी आपला मोर्चा थेट गृहमंत्री अमित शहांकडे वळवल्याचं पाहायला मिळतंय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT