Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंना त्यांच्याच सहकाऱ्यांकडून मोठा धक्का; तब्बल 29 जणांनी उचललं मोठं पाऊल, थेट मंत्र्यांना पत्र धाडलं अन्...

FDA Employees Complaint against Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीत कर्मचाऱ्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. ज्यामध्ये प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचं म्हटलं आहे.
29 officials write letter against Tukaram Mundhe
29 officials write letter against Tukaram MundheSarkarnama
Published on
Updated on

FDA Employees Complaint : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कर्मचारी, अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न आणि औषध प्रशासन प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्या तब्बल २९ अधिकारी, कर्मचाऱ्यांनी थेट खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडे तशी तक्रार केली आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेत सर्व काही आलबेल नसल्याचं सांगत या २९ जणांनी 15 जुलै रोजी नरहरी झिरवाळ यांना पाठवलेल्या निवेदनात मुंढे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

या निवेदनातून या कर्मचाऱ्यांनी, दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामाचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.

शिवाय याअधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जे तक्रार करणारं पत्र पाठवलं आहे. त्यावर त्यांच्या सह्याही आहेत. सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीत कर्मचाऱ्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत.

ज्यामध्ये प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही. रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असून विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत असल्याचं म्हटलं आहे.

सकाळी 9 ते रात्री 12 अशा वाढीव वेळेत काम करावे लागत असून शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश दिल्याचं कर्मचाऱ्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

तसंच वाढलेल्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. अन्न, औषध आणि सौंदर्यप्रसाधनांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी घाई केली जात असल्याने विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे.

29 officials write letter against Tukaram Mundhe
Smart Meter Row : 5 हजारांहून थेट 20 हजार बील, शिंदेंच्या मंत्र्यानेच केली स्मार्ट मीटरची पोलखोल; अखेर महावितरणने दिलं स्पष्टीकरण

भारतीय औषध संहिता, ब्रिटिश, USP अशा मानकांनुसार तपासणीसाठी पुरेसा वेळ आवश्यक असताना तो मिळत नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. एका विश्लेषकाकडून मर्यादेपेक्षा जास्तीचे नमुने तपासण्याचा दबाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

त्यामुळे या प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांनी दोन शिफ्ट सुरू करण्यापूर्वी प्रयोगशाळेची क्षमता आणि मनुष्यबळ वाढविण्याची मागणी केली आहे. तसंच दोन शिफ्टचा निर्णय रद्द करावा, अन्यथा अतिरिक्त कामासाठी योग्य भत्ते व सुविधा द्यावी अशी मागणी केली आहे.

एकीकडे प्रयोगशाळेतील अधिकारी कर्मचाऱ्यांनी मुंढेंविरोधात तक्रारीचा पाढा वाचला आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलचा अन्न परवाना रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने केवळ एक-दोन झुरळे आढळल्यामुळे थेट परवाना रद्द करणे योग्य नसल्याचं म्हटलं आहे.

29 officials write letter against Tukaram Mundhe
Tukaram Munde: सिन्नरच्या जनता दरबारात तुकाराम मुंढे यांच्या FDA विभागाचा पंचनामा; भेसळखोरांना संरक्षण?

यावेळी न्यायलयाने अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले. केवळ खासगी आस्थापनांवर कारवाई न करता सरकारी मालकीच्या आस्थापनांचीही तपासणी करण्याचे निर्देश न्यायालयाने दिलेत.

मंत्रालय, उच्च न्यायालय तसेच सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांमधील कँटिनचीही तातडीने पाहणी करून शुक्रवारी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना दुहेरी धक्का बसल्याचं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com