CJP Legal Aid: देशभरात आपला प्रभावी दबाव गट निर्माण करत एकामागून एक सरकारला जागे करणारे कार्यक्रम लॉन्च करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीनं आता आणखी एक महत्वाचं पाऊल टाकलं आहे. सरकारला यातून प्रश्न विचारले जाणार नाहीत, सरकारी यंत्रणांनी किंवा इतरांकडून त्रास दिल्यास त्याला कायदेशीर मदत करणारा हा कार्यक्रम आहे. यामुळं सीजेपीच्या विश्वासार्हतेत आणखी भर पडली आहे.
सीजेपीच्या कायदेशीर मदत व्यासपीठाद्वारे उत्तम शिक्षणासाठी आवाज उठवताना तुमची छळवणूक झाली, तुम्हाला भीती दाखवली गेली किंवा तुम्हाला हिंसाचाराचा सामना करावा लागल्यास सीजेपीच्या कायदेशीर मदत व्यासपीठाद्वारे संपर्क साध येणार आहे. या प्रकरणांमध्ये शक्य असलेली सर्वोत्तम कायदेशीर मदत देऊ आणि या संपूर्ण प्रक्रियेत तुम्हाला पाठिंबा देऊ, असं आश्वासन सीजेपीकडून देण्यात आलं आहे. देशभरात हे कायदेशीर मदतीचं व्यासपीठ काम करणार आहे. त्यामुळं कॉक्रोच जनता पार्टीचा कोणताही पाठिराखा एकट्यानं कायदेशीर धक्के खाणार नाही, त्याच्यासोबत सीजेपी असेल तसंच या व्यासपीठावर संबंधित व्यक्तीची गोपनियता राखली जाणार आहे, असं सीजेपीच्या लिगल अफेअर्स हेड रत्ना सिंग यांनी म्हटलं आहे.
सीजेपीसोबत काम करत असताना लोकांना व्यवस्थेकडून त्रास दिला जात होता, त्यांची छळवणूक केली जात होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात होते, अटक होत होती... त्यामुळं या अडचणींचा सामना करत असताना लोक आमच्याकडं येत होते तेव्हा त्यांना कुठे जावं? कशा पद्धतीनं जावं हे त्यांना कळत नव्हतं त्यामुळं आम्हाला त्यांना कायदेशीर मदतीसाठी हे व्यासपीठ तयार करण्याची गरज वाटली. त्यातूनच सीजेपीचं एक स्वतंत्र कायदेशीर मदतीचं व्यासपीठ अर्थात लिगल एड वेबसाईट तयार झाली, असंही रत्ना सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.
हा कायदेशीर प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी वरिष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सीजेपीच्या कायदा विभागातील टीमला मदत केली आहे. तसंच देशभरातील सर्व वरिष्ठ वकिलांनी आम्हाला मदत करावी अशी विनंती देखील सीजेपीनं केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.