Rahul Gandhi: राहुल गांधी पुन्हा पुण्यात येणार! 'छात्रों की गुंज' कार्यक्रमात आदिवासी विद्यार्थीनीला दिलेला शब्द पळणार

Rahul Gandhi: पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या छात्रों की गुंज या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांची एका आदिवासी मुलीनं भेट घेतली होती. यावेळी तीन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.
Rahul Gandhi letter to Devendra Fadnavis.
Rahul Gandhi letter to Devendra Fadnavis.Sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi: पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या छात्रों की गुंज या विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांची एका आदिवासी मुलीनं भेट घेतली होती. यावेळी तीन आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या. यावेळी मी तुमच्या आंदोलनाला भेट देईन असं आश्वासन त्यांनी या मुलीला दिलं होतं. तिला दिलेला शब्द राहुल गांधी पाळणार आहेत. कारण त्यांच्या मांजरी दौऱ्याची चर्चा आता सुरु झाली आहे. आज संध्याकाळपर्यंत राहुल गांधींचा दौरा फिक्स होण्याची शक्यता आहे, अशी माहिती काँग्रेसच्या आदिवासी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष विक्रांत भुरिया यांनी दिली आहे.

Rahul Gandhi letter to Devendra Fadnavis.
Jantar-Mantar Protest: जंतर-मंतरवर आंदोलनाला परवानगीपूर्वी आता 'फंडिंग'ची होणार चौकशी; दिल्ली पोलिसांची नवी नियमावली; कठोर नियम ऐकून बसेल धक्का

पुण्यातील छात्रों की गुंज या कार्यक्रमात राहुल गांधींनी पुण्यातील महाविद्यालयीन मुलींशी जाहीर संवाद साधला होता. या संवादादरम्यान एका आदिवासी सामाजाच्या विद्यार्थ्यांनीनं स्टेजवर येऊन त्यांच्याशी संवाद साधला होता. अत्यंत भावूक होत तिनं आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या राहुल गांधींसमोर मांडल्या होत्या. दुर्गम भागातील आश्रम शाळांची दुरावस्था, तसंच नोकऱ्यांसाठीच्या जाचक अटी आणि मुलींचे भेडसावणारे प्रश्न या अनुषंगानं आदिवासी विद्यार्थ्यांनी पुण्याच्या मांजरी इथं आंदोलन सुरु केल्याचं या मुलीनं सांगितलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या दिवसांत आंदोलन सुरु असल्यानं या मुलीसह अनेक आंदोलक आजारी पडले आहेत, पण महाराष्ट्रातील फडणवीस सरकार त्यांची दखल घेत नाही असा आरोप तिनं केला होता. आम्ही आदिवासी विभागाच्या मंत्र्यांना भेटलो पण त्यांनी देखील माझ्या हातात काहीही नाही मुख्यमंत्रीच यावर निर्णय घेऊ शकतात, असं उत्तर या आंदोलकांना दिलं गेलं होतं, असं या मुलीनं खुद्द राहुल गांधी यांना स्टेजवर सांगितलं होतं.

Rahul Gandhi letter to Devendra Fadnavis.
Sanjay Raut: "...तर मी राजकारण सोडेन"; संजय राऊतांचं थेट पंतप्रधानांना आव्हान; भाजपला डिवचलं

त्यानंतर राहुल गांधी यांनी या विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेत मला तुम्ही आंदोलनस्थळी निमंत्रित करा, मी स्वतः येऊन तुमच्यासाठी आंदोलन करेन असं आश्वासन त्यांनी यामुलीला दिलं होतं. त्यामुळं आता राहुल गांधींचा या दिलेल्या शब्दानुसार मांजरीत आंदोलनस्थळी भेट देण्याची योजना आखली जात आहे. तत्पूर्वी त्यांनी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या विद्यार्थ्यांच्या मागण्याकडं लक्ष द्यावं अशी विनंती केली होती. या पत्रानंतर आता थेट दौरा करण्याची हालचाल सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com