Abhijeet Dipke viral tweet latest news: नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने सोमवारी संसदेकडे मोर्चा काढला. या मोर्चात हजारो विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले होते.
संसद भवनापासून काही अंतरावर आंदोलकांना रोखण्यात आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. या कारवाईत अनेक विद्यार्थी जखमी झाले असून काही महिला आंदोलकांनाही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेनंतर CJP प्रमुख अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे.
दीपके यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,'मी आमच्या सर्व समर्थकांची, विशेषतः पुरुष पोलीस अधिकाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाण झालेल्या मुलींची माफी मागतो. आम्ही आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. दिल्ली पोलिसांच्या या अमानुष कृत्यांपासून तुमचं रक्षण करण्यासाठी मी अधिक प्रयत्न करू शकलो असतो.
२० हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या एका धर्मेंद्र प्रधानला वाचवण्यासाठी सरकार आणखी विद्यार्थ्यांचे रक्त सांडायला तयार होते. जर तुम्ही जखमी झाला असाल आणि ही पोस्ट पाहत असाल, तर कृपया मला मेसेज करा. मला तुमच्याशी वैयक्तिकरित्या बोलायचं आहे आणि तुमची माफी मागायची आहे. आम्ही तुमच्या सर्वांसाठी लढत राहू', अशा शब्दात त्यांनी आंदोलकांची माफी मागितली.
दरम्यान, अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जोपर्यंत राजीनामा दिला जात नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ चंद्रशेखर आझाद यांनी दिल्लीत धरणे आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन करत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.