Sonu Beg POCSO Case : श्रीरामपूरमधील गुन्हेगारीचा काळा चेहरा! कुख्यात सोनू बेगला पोक्सो गुन्ह्यात अटक, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, पीडिता गर्भवती

Shrirampur's notorious Sonu Beg booked under POCSO in minor abuse case : आकाश दुबय्या हत्येनंतर चर्चेत आलेल्या बेग टोळीच्या अडचणी वाढल्या; आर्म्स ॲक्ट प्रकरणात कोठडीत असतानाच पोक्सोसह गंभीर कलमे वाढवून न्यायालयाच्या परवानगीनंतर पुन्हा अटक.
Sonu Beg POCSO Case
Sonu Beg POCSO CaseSarkarnama
Published on
Updated on

Shrirampur Crime : हाॅटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या हत्येनंतर श्रीरामपूर शहरातील गुन्हेगारी राज्यात चर्चेत आले. गुन्हेगारीचा बिमोड करण्याची मागणी करत, सर्वसामान्य, व्यापाऱ्यांनी चार दिवस बंद पुकारला.

या गुन्हेगारीत चर्चा कुख्यात बेग टोळी चर्चेत आली. अवैध गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी जयप्रकाश अशोक बेग उर्फ सोनू (वय 40, रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर) विरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता त्याच्याविरोधात अठरावा गुन्हा पोक्सो कायद्यानुसार दाखल झाला आहे.

सोनू बेग हा आता पोलिस कोठडीत आहे. त्याच्याविरोधात एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या गुन्ह्यात (Crime) बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (पोक्सो) कायदेविषयक कलमांची वाढ केली आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर आरोपी सोनू बेगला या दुसऱ्या गुन्ह्यात वर्ग करून अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, 15 जुलैला एका फिर्यादीने त्यांच्या अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून, फूस लावून घरातून पळवून नेल्याची तक्रार श्रीरामपूर (Shrirampur) शहर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

Sonu Beg POCSO Case
Shrirampur Protest : 'हिंदूंना हायब्रिड हिंदुत्ववाद्यांपासूनच धोका'; प्रकाश चित्तेंनी गुन्हेगारीची हादरवणारी 'ऑडिओ क्लिप' भरसभेत ऐकवली

सदर अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक माहिती लागली. काही दिवसांपूर्वी सरस्वती कॉलनी येथील एका फ्लॅटवर धाड टाकून एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केल्याप्रकरणी आर्म्स ॲक्टच्या गुन्ह्यात अटक असलेला आरोपी जयप्रकाश उर्फ सोनू यानेच या मुलीच्या अपहरण केल्याचे निष्पन्न झाले.

Sonu Beg POCSO Case
Shrirampur Crime : "मला हत्यार द्या, मीच एन्काउंटर करतो..."; आकाश दुबय्याच्या वडिलांचा आक्रोश, बेग गँगवर गंभीर आरोप

अपहरण, अत्याचार अन् पीडिता गर्भवती

सोनू बेग याने सदर पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही, तिला लग्नाचे आमिष दाखवून घरातून पळवून नेले. त्यानंतर तिच्यावर बळजबरीने लग्न करण्याची सक्ती केली आणि तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती केले, असे तपासात समोर आले आहे.

गुन्ह्यात वाढीव कलम

हा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर शहर पोलिसांनी या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलमातील तरतुदींनुसार आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमानुसार (पोक्सो) वाढीव कलमांचा समावेश केला आहे. या संदर्भातील रीतसर रिपोर्ट न्यायालयाला सादर करण्यात आला होता.

न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई

अवैध शस्त्र प्रकरणात आधीच कोठडीत असलेल्या सोनू बेगला या गंभीर अत्याचार आणि अपहरणाच्या गुन्ह्यात वर्ग करून अटक करण्याची परवानगी पोलिसांनी न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाकडून कायदेशीर परवानगी प्राप्त होताच, पोलिसांनी सोनू बेग याला गुन्ह्यात वर्ग करून अधिकृतरीत्या अटक केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com