Bihar Gaya :  Chinta Devi
Bihar Gaya : Chinta Devi  Sarkarnama
देश

Gaya : ४० वर्षे केली शहराची स्वच्छता, आता त्याच शहराच्या उपमहापौरपदी सफाई कामगाराची निवड!

सरकारनामा ब्यूरो

Bihar Gaya : बिहारच्या गया जिल्ह्यात नुकतंच महापालिकेची निवडणूक पार पडली.आता पालिकेचा निकाल हाती आले आहेत. येथे रविंद्र कुमार यांचा महापौर पदासाठी विजय झाला आहे, तर उपमहापौरपदासाठी चिंता देवी यांनी निवडणूक जिंकली. विशेष बाब म्हणजे, उपमहापौर चिंता देवी या मागील ४० वर्षांपासून गया महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होत्या. यावेळी त्यांनी उपमहापौर पदासाठी निवडणुक लढवली होती. यात त्यांचा तब्बल १६००० मतांनी विजय झाला आहे. (Bihar News)

चिंता देवी या पालिकेत सफाई कामगार म्हणून मागील ४० वर्षापासून कार्यरत होत्या. नियमितपणे कचरा उचलणे, झाडू मारणे सफाई करणे, हा त्यांचा दैनंदिन कामाचा भाग होता. मात्र यंदा गया महापालिकेच्या उपमहापौर पदासाठी जागा आरक्षित ठेवण्यात आली. यामुळे चिंता देवी निवडणुकीत उभ्य़ा राहिल्या, लोकांच्या समर्थनामुळे ते त्यांना निवडणुकीत प्रचंड मते मिळाली. यामुळे एक सफाई कामगार महिला ते थेट महापालिकेच्या उपमहापौरपदी विराजमान झाल्या.

शहराला स्वच्छ ठेवण्याचं काम त्यांनी मागील ४० वर्षांपासून इमाने इतबारे केलं. पालिकेची एक सफाई कामगार ते पालिकेच्या सत्तेपर्य़ंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. आता ते शहराची उपमहापौरपदाची खुर्चीवर त्या विराजमान होतील. चिंता देवी यांच्या पतीचं काही काळाआधी निधन झालं आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT