WhatsApp Sarkarnama
देश

बंद पडलेले ‘व्हॉट्‌स ॲप’ भारतात दोन तासानंतर सुरू झाले

व्हॉटस ॲप वापरायची सवय झालेल्या नागरिकांची ऐन दिवाळीत सणात अडचण झाली होती.

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : गेल्या दोन तासापासून भारतातील व्हॉट्‌स ॲप (WhatsApp) डाऊन झाले आहे, त्यामुळे संवादाचे मोठे साधन बंद पडल्यामुळे युजर्सकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या. दरम्यान, युद्ध पातळीवर काम करून व्हॉट्‌स अपने ही सेवा अडीच सुमारास सुरू केली आहे, असे मेटाकडून सांगण्यात आले आहे. (Closed 'WhatsApp' started in India after two hours)

गेल्या तासाभरापासून भारतात व्हॉटस ॲप बंद झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या होत्या. अनेकांकडून त्याबाबत मजेशीकर कमेंट केल्या गेल्या आहेत. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हे व्हॉटस ॲप बंद झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, व्हॉटस ॲप वापरायची सवय झालेल्या नागरिकांची ऐन दिवाळीत सणात अडचण झाली होती.

दिवाळीत एकमेकांना शुभेच्छा संदेश देण्यासाठी ‘व्हॉटस ॲप’ चा वापर भारताबरोबच जगभरात मोठ्या प्रमाणात वापर होतो आहे. मात्र, ऐन दिवाळी सणात व्हॉटअप डाऊन झाल्याने कोट्यवधी नागरिकांना शुभेच्छा संदेश पाठविण्यासाठी अडचणी येत आहेत.

‘व्हॉटस ॲप’ची सेवा सुरळीतपणे सुरू करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. ते लवकरच पुन्हा नागरिकांच्या सेवेसाठी कार्यान्वित होईल, असे मेटाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार सुमारे तास ते दीड तासानंतर व्हॉटस ॲपची सेवा सुरू झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर मजेशीर कमेंटचा पाऊस पडला आहे. अनेक जणांकडून मीम्सचा उपयोग करत याबाबतची टीकाटिप्पणी करण्यात आली आहे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT