मनसे आमदाराने युतीचे संकेत देताच श्रीकांत शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट!

खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारीच ठाण्यातील मनसे कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांचे स्वागत केले होते.
Shrikant Shinde-Raj Thackeray
Shrikant Shinde-Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सुपुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आज (ता. २५) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जवळीक वाढली आहे. त्यामुळे या भेटीगाठी दिवाळीनिमित्ताने होत आहेत की नव्या समीकरणांची नांदी आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी युतीचे संकेत देताच खासदार शिंदे यांनी थेट शिवतीर्थ गाठून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. (MP Shrikant Shinde meet Raj Thackeray)

मुख्यमंत्री शिंदे आणि मनसेच्या नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी भाजपला अंधेरीतून माघार घ्यावी, असे पत्र लिहिले होते. त्यांच्या पत्रानंतर भाजपने अंधेरी पूर्वमधून आपला उमेदवार मागे घेतला होता. तेव्हापासून भारतीय जनता पक्षात राज ठाकरे यांच्या शब्दाला किती किमत आहे, हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे.

Shrikant Shinde-Raj Thackeray
राष्ट्रवादीच्या विद्या लोलगे भाऊबीजेला दिलीप कोल्हेंकडे मागणार ‘ही’ ओवाळणी!

एकीकडे भाजप नेत्यांशी असलेली जवळीक सांभाळत मनसेने एकनाथ शिंदे यांच्याशीही जुळवून घेण्यास सुरुवात केली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारीच ठाण्यातील मनसे कार्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी त्यांचे स्वागत केले होते. तसेच युतीचा निर्णय हा सर्वस्वी राज यांचा आहे. भविष्यात त्यांनी आम्हाला सांगितले की, शिंदे गटाबरोबर युती करायची आहे, तर त्यालाही आम्ही तयार असू. हे निश्चित की येथे आमची मनं जुळली आहेत, वरती तारा जुळल्या की सगळं जुळून येईल, असे सांगत आमदार पाटील यांनी शिंदे गट आणि मनसेची युती होऊ शकते, असे अप्रत्यक्ष सुचविले आहे.

Shrikant Shinde-Raj Thackeray
कोकणात पुन्हा मोठा राजकीय भूकंप : उद्योगमंत्र्यांच्या भावाची राजकारणात एन्ट्री?

दरम्यान, मनसेचे आमदार राजू पाटील यांनी युतीचे संकेत देताच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांनी आज थेट शिवतीर्थ गाठून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, ही भेट दिवाळीनिमित्त होती की नव्या समीकरणाची जुळवाजुळव सुरू आहे, याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Shrikant Shinde-Raj Thackeray
धक्कादायक : पिंपरी बाजारपेठेत पोलिसाला भरदिवसा धक्काबुक्की, कपडेही फाडले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com