Delhi CM Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : केजरीवालांना हायकोर्टाकडून दणका; ED च्या अटकेवर दिला महत्त्वाचा निकाल...

Rajanand More

New Delhi News : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी आज दिल्ली हायकोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal News) यांना मोठा दणका दिला आहे.  ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याची याचिका केजरीवालांनी कोर्टात दाखल केली होती. मात्र, ईडीने सादर केलेल्या पुराव्यांनुसार केजरीवालांनी षडयंत्र रचल्याचे दिसते, असे सांगत कोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे. केजरीवालांची अटक कायदेशीर असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

ईडीने (ED) केजरीवालांना मागील महिन्यात अटक केली आहे. सध्या ते तिहार जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. मद्य धोरण घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार केजरीवाल (Arvind Kejriwal) असल्याचा दावा ईडीने कोर्टात केला आहे. तर ईडीने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप केजीरावांनी केला होता.

ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचे केजरीवांनी दिल्ली हायकोर्टात (Delhi High Court) दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. मागील आठवड्यात त्यावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आज कोर्टाकडून निकालाचे वाचन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

न्यायाधीश स्वर्ण कांता शर्मा यांनी निकाल देताना म्हटले की, हे प्रकरण केंद्र सरकार आणि केजरीवालांमधील नसून ईडी आणि केजरीवालांमधील आहे. त्यांना मनी लाँर्डिंग कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. कुणालाही विशेषाधिकार दिला जाऊ शकत नाही. ईडीकडे पुरसे पुरावे आहेत. त्यामुळे केजरीवालांना चौकशीतून सुट दिली जाऊ शकत नाही. कोर्टाची बांधिलकी कायद्याशी आहे, राजकारणाशी नाही.

निवडणुकीच्या घोषणेनंतर केजरीवालांना अटक करण्यात आली आहे. याबाबत कोर्टाने म्हटले की, हा तर्क स्वीकारण्याचा अर्थ म्हणजे या काळात त्यांना अटक झाली नसती तर या अटकेला आव्हान देता आले नसते. अटकेचा निर्णय तपास यंत्रणा घेतात. त्यांच्या आम्ही निर्देश देऊ शकत नाही.

ईडीने पुरावे, जबाब सादर केले आहेत. गोवा निवडणुकीत पैसे पाठवल्याची साखळी यातून समोर येते. आपचे सदस्य हवाला डीलर्सचे जबाबही यामध्ये आहेत, असे कोर्टाने निकालादरम्यान स्पष्ट केले. त्यामुळे केजरीवालांची अटक बेकायदेशीर नसून योग्य असल्याचा निकाल कोर्टाने दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT