CBI | CM Bhagwant Mann OSD FIR sarkarnama
देश

CM Bhagwant Mann OSD FIR : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीवर गुन्हा दाखल, निवासस्थानी सीबीआयचे छापे

CBI Action Against CM Bhagwant Mann’s OSD Rajbir Ghuman : पंजाबचे मुख्यमंत्री भगंवत मान यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मान यांचे ओएसडीवर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

Roshan More

Punjab News : न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या ओएसडीवर मोठी कारवाई केली. ओएसडी राजबीर सिंघ घुम्मन याच्यासह तब्बल सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालायता भ्रष्टाचाराशीसंबिधीत हे प्रकरण आहे.

मंगळवारी रात्री सीबीआयाने मुख्यमंत्री मान यांचे कॅम्प ऑफीस, OSD राजबीर सिंह घुम्मन यांच्या चंडीगढमधील निवास्थानी छापे मारले.

मिडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी संध्याकाळ नंतर सीबीआयच्या तब्बल 50 जणांच्या पथकाकडून छापेमारी करण्यात आली. या छापेमारीनंतर मुख्यमंत्री मान यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर टीका केली.

ते म्हणाले, भाजप निवडणुरकीची तयारी करत आहे. पंजाब सरकारला बदनाम करण्यासाठी ते ईडी,सीबीआयचा वापर करत आहेत. जनतेकडून 'आप'ला मिळत असलेल्या समर्थनामुळे भाजप अस्वस्थ आहे. त्यामुळे ही कारवाई केली जात असल्याचा दावा देखील मान यांनी केला.

नेमकं प्रकरण काय?

पंजाबच्या डिजीपींनी ईडीला पत्र पाठवून राज्य सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यानंतर ईडीने मुख्यमंत्र्यांचे ओएसडी राजबीर सिंह घुम्मन यांच्यासह काही लोकांच्या भूमिका संशयास्पद असल्याचे म्हटले होते. तसेच सरकारमध्ये बदल्या, गोपीनीय माहिती, आर्म्स लायसन्सन देण्यासाठी हस्तक्षेप झाल्याचा ठपका ठेवला होता. दरम्यान, हे केवळ आरोप आहेत. याची चौकशी सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT