PM Narendra Modi Latest News. CM Eknath Shinde Latest News
PM Narendra Modi Latest News. CM Eknath Shinde Latest News Sarkarnama
देश

पंतप्रधान मोदींनीही एकनाथ शिंदेंचं 'ते' भाषण संपूर्ण ऐकलं अन् म्हणाले...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बहुमत सिध्द केल्यानंतर जोरदार भाषण केलं होतं. जवळपास सव्वा तासाच्या या भाषणात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अजित पवार, महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला होता. हे संपूर्ण भाषण खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही ऐकल्याचे आता समोर आलं आहे. (CM Eknath Shinde Latest News)

मुख्यमंत्री शिंदे यांनीच याबाबत माहिती दिली. मुंबईत गुरूवारी मध्यरात्री झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे यांनी पुन्हा एकदा मागील काही दिवसांत झालेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा आपल्याला फोन आल्याचे सांगितले.

शिंदे म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी त्यादिवशीचं एक तास तेरा मिनिटांचं भाषण ऐकलं. हे त्यांनीच सांगितलं. खूप मनापासून भाषण केल्याचं सांगत त्यांनी कौतूक केलं. पण मी त्यांना म्हणालो, खूप कागद आणले होते, ते बाजूला ठेवून बोललो. त्यादिवशी दहा टक्केच बोललो, 90 टक्के पोटात आहे. वेळ आल्यानंतर बोलेन.'

प्रत्येक आमदार मुख्यमंत्री

आपलं सरकार स्थिर आहे. या राज्याचा सर्वांगिण विकास करायचा आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य आहे. आपल्याला मोठं समर्थन मिळत नाही. मंत्रालयात तुमच्या हक्काचा माणूस बसला आहे. मी सगळ्यांना सांगितलंय तुम्ही 50 लोकं मुख्यमंत्री आहेत. हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे आम्हीच त्या खूर्चीवर बसलो आहोत, असं राज्यातील प्रत्येकाला वाटलं पाहिजे, अशी भावना शिंदे यांनी व्यक्त केली.

हे 50 जणं शूर आहेत, असं मोदी म्हणाले

आम्ही फक्त 50 लोक, भाजपकडे 115 लोकं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले 50 आमदार शूर आहेत. ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत, त्यांनाच पाठिंबा द्यायचा, असं पंतप्रधान मोदी सरकारस्थापनेवेळी म्हणाल्याचे शिंदे यांनी भाषणात सांगितले. त्यानंतर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली, असं शिंदे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT