शिंदे सरकारचं महाराष्ट्राला पहिलं मोठं गिफ्ट; पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News, Shivsena Political Crisis
Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News, Shivsena Political Crisissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : वाढत्या महागाई हैराम झालेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना शिंदे सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी इंधनाच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा शिंदे यांनी बैठकीनंतर केली. (Eknath Shinde Latest News)

शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यानुसार पेट्रोलच्या दरात पाच रुपये तर डिझेलच्या दरात तीन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. शिंदे सरकारकडून महाराष्ट्राला हे पहिलं गिफ्ट देण्यात आलं आहे. त्यामुळे महागाईने होरपळलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (Petrol Price drop today)

Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News, Shivsena Political Crisis
राज्यात महापुराचे संकट अन् मंत्रिमंडळ बैठकीत फक्त मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री!

शिंदे म्हणाले, पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 4 नोव्हेंबर व 22 मे रोजी करात कपात केली होती. त्यांनी राज्य सरकारलाही कर कमी करण्याचे आवाहन केलं होतं. परंतु काही राज्यांनी सुचना मान्य करून कर कमी केला होता. महाराष्ट्र शासनाने कर कमी केला नव्हता.

आता युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही आज पेट्रोलवर प्रतिलिटर पाच रुपये व डिझेलवर तीन रुपये दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सहा हजार कोटी रुपयांचा भार शासनावर भार पडणार आहे. जनतेला यातून दिलासा मिळेल. डिझेलच्या दरवाढीमुळे वाढलेली महागाईतूनही दिलासा मिळणार आहे. पेट्रोलमध्ये दर कमी केल्याने नागरिकांनाही दिलासा मिळेल, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं.

Eknath Shinde News, Shivsena Latest Marathi News, Shivsena Political Crisis
Maharashtra News : महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनमध्ये, राज्यपाल कुठे आहेत?

दरम्यान, राज्यातील अनेक भागात पावसाने थैमान घातले आहे. अनेक नद्यांना महापूर आल्याने शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. पण अशास्थितीत राज्यात मंत्रिमंडळच अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेच राज्याचा गाडा हाकत आहेत. आजची मंत्रिमंडळाची बैठकही दोघांनीच घेतली. त्यामुळे आता विरोधकांकडून टीका होऊ लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com