Mamata Banerjee Sarkarnama
देश

Mamata Banerjee News: CM ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप; म्हणाल्या,'पश्चिम बंगालला बांगलादेश बनवण्याचा...'

Mamata Banerjee On BJP : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.

Deepak Kulkarni

Kolkata News : कोलकातामधील आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 9 ऑगस्टला एका महिला निवासी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता.या महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरुन भाजप आक्रमक झाला असून राजकारण तापलं आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerji) यांच्यावर भाजपने या प्रकरणावरुन टीकेची झोड उठवली होती.आता बॅनर्जी यांनी भाजपच्या टीकेवर पलटवार करतानाच गंभीर आरोप केला आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणी विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे.त्या म्हणाल्या,'माकप आणि भाजप (BJP) पीडित मुलीच्या कुटुंबाला आधार देण्याऐवजी या घटनेचे राजकारण करु पाहत आहेत.ते पश्चिम बंगालचा बांगलादेश करू शकतात, असं त्यांना वाटत आहे.पण मी हे कधीही होऊ देणार नसल्याचं बॅनर्जी यांनी ठणकावून सांगितले.

ममता बॅनर्जी म्हणाल्या,'मला या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलिस आयुक्तांशी चर्चा केली.पीडितेच्या अंत्यसंस्कारापर्यंत आपण त्यांच्या संपर्कात होतो.पीडितेच्या पालकांचेही सांत्वन करतानाच त्यांना धीरही दिला.बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा देणार असल्याचेही पीडितेच्या कुटुंबाला आपण सांगितल्याचेही त्या म्हणाल्या.

कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एका महिला निवासी डॉक्टरचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. 8 ऑगस्टच्या रात्री बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालात पीडितेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याप्रकरणी पोलिसांनी 12 तासांत मुख्य आरोपी संजय रॉयला अटक केली होती.उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचेही आम्ही पूर्णपणे पालन करू आणि सीबीआयला सहकार्य करणार असल्याचेही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. मात्र, हे प्रकरण मंगळवारी न्यायालयाने सीबीआयकडे सोपवल्याची माहितीही त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT