Mamata Banerjee to contest from Bhabanipur in the Assembly bypolls
Mamata Banerjee to contest from Bhabanipur in the Assembly bypolls Sarkarnama
देश

विरोधकांच्या एकजूटीसाठी ममतांचे प्रयत्न; नवीन पटनायकांनी लगेचच दिला धक्का

सरकारनामा ब्युरो

दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जींनी बिगर भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील काही प्रमुख नेत्यांना पत्र लिहून भाजपविरोधातील लढाईसाठी एकजूट होण्याचे आवाहन केले आहे. बॅनर्जींनी या पत्रात भाजप विरोधातील रणनितीवर चर्चा करण्यासाठी आणि एकजूट, एकसंध विरोधी गट तयार करण्यासाठी एक बैठक बोलावण्याची विनंती केली आहे.

या पत्राच्या माध्यमातून, "भाजपकडून लोकशाहीवर होणाऱ्या हल्ल्याविरोधात चिंता व्यक्त करण्यासाठी आणि देशाला जे सरकार अभिप्रेत आहे ते देण्याचा प्रयत्न करण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. बॅनर्जी म्हणाल्या, देशातील सर्व प्रगतीशील ताकदीला एकत्र येवून भाजप सरकारच्या विरोधात लढण्याची गरज आहे. बॅनर्जी यांनी हे पत्र २७ मार्च रोजी लिहीण्यात आले असून आज ते समाजमाध्यमांवर शेअर करण्यात येत आहे.

दरम्यान ममता बॅनर्जी यांच्या या पत्रावर ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी हात वर केले असून त्यांनी यातून एक प्रकारे ममता यांना धक्का दिला आहे. पटनायक म्हणाले, मला कोणतेही पत्र अद्याप मिळालेले नाही. आम्ही केवळ आमच्या राज्याचा विकास आणि कल्याण या दोन गोष्टींच्या बाजूने उभे आहोत. आमच्या पक्षाची देखील हिच भूमिका आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र मिळाले असून लवकरच या बैठकीची तारिख आणि वेळ ठरवण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT