PM मोदींनी घेतली भाजप खासदारांची शाळा; दिलेला होमवर्क १५ दिवसांत पूर्ण करा!

PM Narendra Modi | Bjp Parliamentary Party Meeting : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना दिला होमवर्क
Narendra Modi
Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : दिल्लीच्या आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये आज भाजपच्या संसदीय दलाची बैठक पार पडली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह बहुसंख्य खासदार उपस्थित होते. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी भाजप खासदारांना मार्गदर्शन केले, सोबतच ६ एप्रिल रोजीचा पक्षाचा स्थापना दिवस आणि १४ एप्रिल रोजीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदारांना कामाला देखील लावले आहे.

या बैठकीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री अर्जून राम मेघवाल म्हणाले, भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. सोबतच भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ६ ते १४ एप्रिल दरम्यान आम्हा सर्वांना सामाजिक न्यायासाठी ठिकठिकाणी बैठका घेण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ एप्रिल ते १४ एप्रिल या दिवसांसाठी भाजप खासदारांसाठी एक कार्यक्रम दिला.

Narendra Modi
UPSC टॉपर टीना दाबी होणार पुण्याच्या सुनबाई; २२ एप्रिलला लग्न

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले, ६ एप्रिल रोजी भाजपचा स्थापना दिवस आहे. तर १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या पार्श्वभूमीवर या काळात प्रत्येक खासदारांनी आप-आपल्या मतदारसंघात जावून केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना पंतप्रधान मोदींनी दिल्या आहेत. मागच्या १५ दिवसांत भाजपच्या संसदीय दलाची ही दुसरी बैठक झाली आहे. यापूर्वीच्या बैठकीत मोदी यांनी ५ राज्यांच्या निकालानंतर अनेक मुद्द्यावर चर्चा करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com