naveen patnaiks  sarkarnama
देश

मुख्यमंत्र्यांच्या 'नवीन' टीममध्ये पाच महिलांचा समावेश, १२ नवीन चेहऱ्यांना संधी

ओडिशाच्या राजकीय इतिहासात पहिल्यादांच असे झाले की, सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले.

सरकारनामा ब्युरो

भुवनेश्वर : ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या मंत्रीमंडळाचा आज शपथविधी झाला. पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजू जनता दलाच्या (bjd)सरकारच्या सर्व मंत्र्यांनी शनिवारी राजीनामा दिला होता. फेरबदल करण्यासाठी हे राजीनामे घेण्यात आले होते. (cm naveen patnaiks new team)

२०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी पटनायक यांनी हा फेरबदल केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ओडिशाच्या राजकीय इतिहासात पहिल्यादांच असे झाले की, सर्व मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले.

पटनायक यांच्या नवीन टीममध्ये पाच महिलासह १२ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर १२ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. एकुण २१ मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यात १३ कॅबिनेट तर ८ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. पाच महिलापैकी तीन जणी कॅबिनेट मंत्री बनल्या आहेत. दोन महिला राज्यमंत्री झाल्या आहेत. राज्यपाल गणेश लाल यांनी मंत्र्यांना शपथ दिली.

बारा मंत्र्यांना घरी पाठवलं

बारा मंत्र्यांना घरी पाठविण्यात आले त्यात न्यायमंत्री प्रताप सेना, उच्च शिक्षण मंत्री अरुण साहू, राज्यमंत्री (गृह) दिव्य शंकर मिश्रा, परिवहन मंत्री पद्दनाभ बेहरा, कामगारमंत्री सुशांत सिंह यांचा समावेश आहे. राजेंद्र ढोलकिया, प्रताप केशरी देब, प्रमिला मलिक, रोहित पुजारी,अश्विनी कुमार पात्र, अतनु सब्यसाची नायक, प्रशांत मुदुली, श्रीकांत साहू, उषा देवी, प्रीतिरंजन घडाई,रीता साहू, प्रदीप कुमार अमात या बारा नव्या चेहऱ्यांचा समावेश पटनायक सरकारमध्ये करण्यात आला आहे.

हे आहेत १३ कॅबिनेट मंत्री

1. जगन्नाथ सारका

2. निरंजन पुजारी

3. रणेन्द्र प्रताप स्वांई

4. प्रमिला मलिक

5. ऊषा देवी

6. प्रफुल्ल मलिक

7. प्रताप देव,

8. अतनु सव्यसाची नायक

9. प्रदीप अमात

10. नव किशोर दास,

11. अलोक चन्द्र पंडा,

12. टुकुनी साहू,

13. राजेन्द्र ढोलकिया

हे आहेत आठ राज्य मंत्री

1. समीर रंजन दास

2. अश्विनी कुमार पात्र

3. प्रीति रंजन घड़ेई

4. श्रीकांत साहू,

5. तुषारकांति बेहेरा,

6. रोहित पुजारी,

7. रीता साहू,

8. बासंती हेम्ब्रम

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT