फडणवीसांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण ; राज्यसभा निवडणुकीला उपस्थित राहतील का?

दोन दिवसांपुर्वी आघाडीच्या नेत्यांनी फडणवीस यांची भेट घेतली होती. छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई उपस्थित होते.
 Devendra Fadnavis, Rajyasabha Election
Devendra Fadnavis, Rajyasabha Electionsarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा कोराना (corona) अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी टि्वट करीत कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. ( Devendra Fadnavis latest news)

फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याने सध्या ते गृहविलगीकरणात आहेत. राज्यसभेसाठी येत्या 10 जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीला ते उपस्थित राहणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

दोन दिवसापासून फडणवीस यांना ताप येत होता. ते काल लातूरला होते. तेथून ते सोलापूरला जाणार होते. सोलापूर दौरा रद्द करुन फडणवीस मुंबईला परतले. मुंबईला आल्यावर त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

 Devendra Fadnavis, Rajyasabha Election
Rajyasabha Election : मनसेचे मत कुणाला ? ; राजू पाटलांनी स्पष्टच सांगितलं..

राज्यसभेच्या निवडणुकीबाबत दोन दिवसांपुर्वी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी फडणवीस यांची त्यांच्या सागर या बंगल्यावर भेट घेतली होती. छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई हे या बैठकीला उपस्थित होते. आज (रविवार) संध्याकाळी राज्यसभेसंदर्भातली बैठक आहे. त्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार नाहीत, असे सुत्रांनी सांगितले.

ध्या त्यांच्यावर गृहविलगीकरणामध्ये उपचार सुरू आहेत. यापुर्वी दुसऱ्या लाटेत देखील फडणवीस कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते उपचार घेत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com