siddaramaiah  sarkarnama
देश

Cm siddaramaiah News : कर्नाटकात पुन्हा ऑपरेशन लोटस? सिद्धरामय्यांचा मोठा दावा

Akshay Sabale

गेल्या वर्षी झालेल्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत दक्षिणेतील एकमेव राज्यही भाजपनं गमावलं होतं. पण, आता पुन्हा कर्नाटक राज्य ताब्यात घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केला जात आहे. यासाठी 'ऑपरेशन लोटस'चा प्रयोग केला जात असल्याचा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ( Cm Siddaramaiah ) यांनी केला आहे. आमदारांना कोट्यवधींची आमिषे दाखवल्याचा दावाही सिद्धरामय्या यांनी केला. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

सिद्धरामय्या ( Cm Siddaramaiah ) म्हणाले, "लोकसभा निवडणुकीपूर्वी ( Lok Sabha Election 2024 ) भाजप दक्षिणेतील राज्यात ऑपरेशन लोटस राबवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपनं काँग्रेसच्या आमदारांना 50 कोटींची ऑफर दिली आहे. गेल्या एक वर्षापासून सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण, आमचे आमदार पक्ष सोडणार नाहीत."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"काँग्रेसच्या आमदारांना 50 कोटींची ऑफर देण्यात आली होती. मात्र, भाजपचा हा प्रयत्न फसला. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल," असा विश्वास सिद्धरामय्यांनी व्यक्त केला.

दुसरीकडे, सिद्धरामय्यांनी केलेल्या आरोपांचं कर्नाटकमधील भाजपचे खासदार एस. प्रकाश यांनी खंडण केलं आहे. "फक्त एका वर्गाची सहानुभूती मिळवण्यासाठी सिद्धरामय्या वारंवार हे आरोप करत आहेत. लोकसभेला 28 जागा जिंकण्यावर भाजपनं लक्ष केंद्रित केलं आहे. तर, सिद्धरामय्या निवडणुकीनंतर आपले पाय रोवण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत," असं एस. प्रकाश यांनी म्हटलं.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT