BJP News: जनसंघाच्या तीन खासदारांपासून 303 पर्यंत भाजपची घाेडदौड, यंदा '400 पार' करणार?

Lok Sabha Election 2024: जनसंघ हिंदुत्वाची कास धरून हा काम करत होता. पहिल्या निवडणुकीत या पक्षाचे ३ खासदार निवडून आले होते. 1971 च्या निवडणुकीत जनसंघाच्या खासदारांची संख्या दोन अंकी झाली.
BJP, Narendra Modi
BJP, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाने (BJP) यंदाच्या लोकसभेसाठी 'अब की बार 400 पार'चा नारा दिला आहे. याआधी दोन वेळा या पक्षाची देशात एकहाती सत्ता होती, तर तिसऱ्यांदा देशात आपलंच सरकार येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्यक्त केला आहे. आज 400 च्या पुढे जागा मिळवण्याची इच्छा बाळगलेल्या या पक्षाचे कधी काळी केवळ 3 खासदार होते, जे पुढे 303 पर्यंत गेले, तर जनसंघाच्या 3 खासदारांपासून भाजपचे 303 खासदारांपर्यंतची राजकीय घाेडदाैड नेमकी कशी होती? ते जाणून घेऊया.

राज्यघटना लागू झाल्यानंतर 1952 मध्ये भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसला (Congress) चांगले यश मिळाले. या पक्षाला 489 पैकी 464 जागा मिळाल्या. त्याचं कारण होतं स्वातंत्र्य काळातील काँग्रेसचं योगदान आणि त्यामुळे काँग्रेसने देशातील जनतेच्या मनात घर केलं होतं. शिवाय या काळात काँग्रेसचं वर्चस्व एवढं होतं की विरोधी पक्ष केवळ नावाला उरले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जनसंघ आणि जनता पक्ष वेगळे झाले

विरोधी पक्षांमध्ये एक पक्ष होता तो म्हणजे जनसंघ. हिंदुत्वाची कास धरून हा पक्ष काम करत होता. पहिल्या निवडणुकीत या पक्षाचे ३ खासदार निवडून आले होते. 1971 च्या निवडणुकीत या पक्षाच्या खासदारांची संख्या दोन अंकी झाली. या निवडणुकीत त्यांचे 22 खासदार झाले. परंतु, 1977 आणि 1980 च्या निवडणुकांमध्ये जनता पक्षाच्या तिकिटावर जनसंघ निवडणूक लढला. पुढे 1980 मध्ये जनसंघ आणि जनता पक्ष वेगळे झाले, त्याचवर्षी जनसंघाचे भारतीय जनता पक्ष असे नामकरण झाले.

जनसंघाला 1989 मध्ये देशात 85 जागांवर यश मिळाले, तर काँग्रेसला 197 पुढे 1991 मध्ये काँग्रेसला 244 आणि भारतीय जनता पक्ष (BJP) लढला त्यांना तब्बल 121 जागांवर यश मिळालं. त्यानंतर भाजपचे खासदार हे तीन अंकी संख्येचेच राहिले. 1999 मध्ये भाजपचे 182 तर काँग्रेसचे 114 खासदार होते. यानंतरच्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये (Lok Sabha Election) भाजपला 138, 116 अशा जागा मिळाल्या.

मोदी लाट

भाजपने एकहाती सत्ता मिळवली ती नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात . 2024 च्या निवडणुकांनंतर भाजपला चांगलं यश मिळालं, या वेळी मोदींचा करिष्मा अवघ्या देशाने पाहिला. या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला तब्बल 282 जागा आल्या आणि देशात एनडीएचं सरकार आलं, तर त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही पुन्हा एकदा मोदी सरकारचा नारा घुमला आणि मोदींच्या नेतृत्व मान्य करत देशातील जनतेने पुन्हा एकदा भाजपला विजयी केलं. ती निवडणूक होती 2019 ची या निवडणुकीत भाजप 300 पार झाला आणि त्यांचे 303 खासदार निवडणून आले, तर आता या पक्षाच्या अपेक्षा वाढल्या असून, यंदा आपण 400 पार जाऊ, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपच्या विजयाचा हा चढता आलेख या निवडणुकीतही असाच राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

BJP, Narendra Modi
Lok Sabha Election 2024 : खुद्द आंबेडकर परत आले तरी..! संविधानाबाबत काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

भारतीय जनता पक्षाची स्थापना

भारतीय जनता पक्ष हा आणीबाणीपूर्वी भारतीय जनसंघाच्या नावाने कार्यरत होता. 21 ऑक्टोबर 1951 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. या पक्षाचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आरएसएसचे (RSS) स्वयंसेवक होते.

BJP, Narendra Modi
CSDS- Pre-Poll Survey : राम मंदिर, हिंदुत्व, कलम 370 नाही तर जनता 'या' मुद्द्यांवर करणार मतदान

आणीबाणीमुळे एकवटले विरोधक

तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी लागू केली. या काळात त्यांनी आपल्या सर्व विरोधकांना तुरुंगात घातलं. जनतेच्या तीव्र विरोधामुळे 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी मागे घेण्यात आली. आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनाचे नेतृत्व समाजवादी नेते जयप्रकाश नारायण (Jaiprakash Narayan) यांनी केलं होतं. त्यांच्या सूचनेनुसार देशातील सर्व विरोधी पक्ष जनता पक्षाच्या नावावर एकत्र आले.

भारतीय जनसंघही त्यामध्ये विलीन झाला आणि १९७७ ची निवडणूक विरोधकांनी जनता पक्षाच्या नावावर लढवून इंदिरा गांधीचा पराभव केला. यानंतर जनता पक्ष सत्तेत आला, परंतु वैचारिक मतभेदामुळे जनसंघाचे नेते जनता पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी 6 एप्रिल 1980 रोजी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भाजपची स्थापना केली.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com