cm Yogi Adityanath on Akhilesh Yadav News : उत्तर प्रदेश विधानसभेत आजी-माजी मुख्यमंत्र्यांच्या कलगीतुऱ्याने आजचा (शनिवार) दिवस चांगलाच गाजला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) आणि सपाचे नेते, विरोधीपक्षनेते, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (akhilesh yadav) यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले.
विधीमंडळाचे कामकाज सुरु असताना प्रयागराज हत्याकांड विषयावर चर्चा सुरु होती. या विषयावर बोलताना "मुलांकडून चुक होऊन जाते," असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. यावर अखिलेश यादव यांनी त्यांना मध्येच रोखून काही प्रश्न विचारले.
त्यावर मुख्यमंत्री योगी संतापले. त्यांनी मुलायम सिंह यांच्या काळात माजी मुख्यमंत्री मायावती यांच्यासोबत झालेल्या गेस्ट हाऊस प्रकरणाचे उदाहरण दिले.
योगी आदित्यनाथ अखिलेश यादव यांना उद्देशून म्हणाले, "ज्यांनी आपल्या वडिलांना सन्मान दिला नाही, त्यांना उत्तर प्रदेशाच्या सुरक्षाविषयी बोलताना लाज वाटली पाहिजे,"
यानंतर अखिलेश यादव आणि योगी आदित्यनाथ यांच्यात जोरदार खंडाजंगी झाली. राज्यपाल आनंदी पटेल यांच्या अभिभाषणावर चर्चा होत असताना सभागृहात मोठा गोंधळ झाला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे भाषण करीत असताना विरोधकांनी घोषणा दिल्या. राज्यपाल आनंदी पटेल यांच्या अभिभाषणाच्या वेळी त्यांना रोखण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. यावर मुख्यमंत्र्यांनी खंत व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.