Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीसांनी दिलेले संकेत धूसर..; मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त...

Budget Session Maharashtra Cabinet Expansion : हा मुहूर्त देखील सध्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीमुळे पुन्हा एकदा हुकल्याचे दिसत आहे.
Cabinet Expansion:
Cabinet Expansion:Sarkarnama
Published on
Updated on

Budget Session Maharashtra Cabinet Expansion : राज्यातील सत्तासंघर्षाने शिंदे-फडणवीस सरकारला गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून घेरले आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यानुसार हे दोन्ही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहाल करण्यात आले आहे. तर, सत्तासंघर्षाची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे. पण मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा अद्याप अनुत्तरीत आहे.

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार कधी होणार? हा प्रश्न अजून गेल्या आठ महिन्यानंतरही अधांतरीच आहे. राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्याला अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे अधिवेशनात मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता धूसर झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याचे संकेत दिले होते. मात्र हा मुहूर्त देखील सध्याच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीमुळे पुन्हा एकदा हुकल्याचे दिसत आहे.

Cabinet Expansion:
Assembly Elections: निवडणुकीपूर्वीच काँग्रेसकडून मोठी घोषणा : दारिद्र रेषेखालील कुटुंबांना..

"दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात होईल," असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसापूर्वी दिले होते. पण आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त टळला असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारला 29 जूनला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 30 जूनला मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर जवळपास 39 दिवसांनी (9 ऑगस्ट 2022) मंत्रिमंडळ पहिला विस्तार झाला होता.

Cabinet Expansion:
Nitesh Rane : केजरीवाल-ठाकरे भेटीनंतर राणेंचं टि्वट ; म्हणाले, ' खलिस्तानवाद्यांचं समर्थन.."

आशेवर पाणी फिरले

पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री होण्याची संधी न मिळाल्यामुळे काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तेव्हापासून दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचे इच्छुकांना वेध लागले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार होईल, या आशेवर पाणी फिरले आहे. वारंवार तारखा सांगून पहिला विस्तार झाला होता, तशाच प्रकार सध्या तरी सुरु आहे. कधी सत्तासंघर्ष, तर कधी शिवसेना कुणाची ? या वादामुळे दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही रखडला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यांनीही मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण नाही , असे वारंवार सांगितले आहे. तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी असे आश्वासन दिले होते. "जानेवारी महिन्याच्या अखेरीस सांगितले की मंत्रिमंडळ विस्तारात कोणताही कायदेशीर पेच नाही.संविधानिक अडचण नाही. आम्ही कदाचित अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करू," असे फडणवीस म्हणाले होते.

दुसरा विस्तार कधी ?

"शपथविधीसाठी आमदारांनी कोट शिवून ठेवले आहेत, पण मंत्रिमंडळ विस्तार होत नाही," असे खोचक टीका विरोधक करीत आहेत. शिंदे-फडणवीसांची शपथ घेतल्यानंतर जवळपास 39 दिवसांनी (9 ऑगस्ट 2022) मंत्रिमंडळ पहिला विस्तार झाला होता. आता दुसरा विस्तार कधी होणार, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com