Delhi Political News : केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थानसह एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. निवडणुकांची घोषणा होताच भाजप उमेदवारांकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा, रॅलीसाठी मागणी वाढली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर स्टार प्रचारक म्हणून योगी आदित्यनाथ यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मागणी कमी झाल्याचे चित्र आहे. आपल्या मतदारसंघात योगी आदित्यनाथ यांची सभा, रॅली व्हावी, यासाठी पाचही राज्यांतील उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींना साकडे घातले आहे.
पाचही राज्यांत भाजपकडून उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराची रणनीती आखताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या प्रचारात सहभागी व्हावेत, यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ लागली आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये सर्वाधिक मागणी योगी आदित्यनाथ यांना आहे.
येथील प्रत्येक जिल्ह्यातील उमेदवारांनी फायर बँड, हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या योगींना पसंती दिली आहे. अनेकांनी याबाबतचा प्रस्ताव प्रदेश कार्यालय आणि केंद्रीय कार्यालयाला पाठवला आहे. योगी यांच्या किती आणि कुठे सभा होतील, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहेत. आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात योगींचा प्रचार दौरा सुरू होणार आहे.
भाजपचे उमेदवार आपल्या विभागात योगींची सभा ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणामध्ये होत असलेल्या निवडणूक प्रचारासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.
कडव्या हिंदुत्वाचा चेहरा असलेले ५१ वर्षांचे योगी आदित्यनाथ आपल्या भडक, फटकेबाज भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी थोडा संयम राखला असला तरी ते मुस्लिमांबाबत असलेल्या आपल्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखले जातात. आक्रमक शैली आणि भगव्या वस्त्रांमुळे त्यांचं आकर्षण लोकांना आहे.
मोदींनंतर योगी यांच्या सभांना गर्दी होत असल्याने त्यांच्याबाबतच सामान्यांना आकर्षक आहे. याचा पुरेपूर फायदा भाजप करून घेणार आहे.
योगींनी उत्तर प्रदेशात विकासाचं एक नवं पर्व सुरू केल्याने त्यांच्याबाबत भाषणांना गर्दी होते.
उत्तर प्रदेशात पुन्हा सत्ता काबिज केल्याने पक्षात योगींचे वजन वाढले आहे.
मिझोराम - 7 नोव्हेंबर रोजी मतदान
छत्तीसगड - 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान
मध्य प्रदेश - 17 नोव्हेंबर रोजी मतदान
राजस्थान - 25 नोव्हेंबर रोजी मतदान
तेलंगणा - 30 नोव्हेंबर रोजी मतदान
पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.