Lalit Patil News : ड्रगमाफियाची आई म्हणाली, "पालकांनो, मुलांकडे लक्ष द्या; ललित-भूषणकडे आम्ही लक्ष देऊनही ते... "

Lalit Patil Drugs Case : गेल्या काही महिन्यांपासून भूषणदेखील आमच्या संपर्कात नाही,"
Lalit Patil
Lalit Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : ससून रुग्णालयातून पळून गेलेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याचा पोलिस शोध घेत आहेत. ललितची आई भाग्यश्री पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. "पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी, आम्ही लक्ष देऊनही असे झाले नाही," असा सल्ला भाग्यश्री यांनी दिला.

हे मला बातम्यांमधून कळाले...

"माझी मुलं ड्रग्ज प्रकरणात आहेत, हे मला बातम्यांमधून कळाले. हे समजल्यानंतर माझ्या पतीला मोठा धक्का बसला आहे. ललितशी आमचे तीन चार वर्षांपासून कुठलेही संबंध नाहीत," असे त्या म्हणाल्या. ललितचा भाऊ भूषण याला पुणे पोलिसांनी उत्तर प्रदेशातून नुकतीच अटक केली आहे.

Lalit Patil
Tuljapur Bandh News: तुळजाभवानी मंदिर मंडप वाद पेटला; पुजारी आक्रमक

त्यांच्या वडिलांना धक्का

भाग्यश्री पाटील म्हणाल्या, "ललित आधी एका वाईन कंपनीत कामाला होता. नंतर त्याने परदेशात शेळी विक्रीचा व्यवसाय तीन ते चार वर्षे केला. ललित आणि भूषण हे अमली पदार्थ तस्करीत असल्याचे कळल्यानंतर त्यांच्या वडिलांना धक्का बसला असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी आमच्या घराची झडती घेतली असून, त्यात पेनड्राइव्ह सापडले आहे. आमचे मोबाईलही पोलिसांनी केले जप्त आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भूषणदेखील आमच्या संपर्कात नाही."

आरोग्य कर्मचाऱ्यांवर कारवाई नाही...

ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून जाण्याच्या घटनेला आठ दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही ललित पाटील याचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. रुग्णालयातून रुग्ण पळून गेल्याने पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही.

राजकीय कनेक्शन

गेल्या नऊ महिन्यांपासून ललित पाटील हा ससून रुग्णालयात दाखल होता. ललित पाटील प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री दादा भुसे यांच्याकडे बोट दाखवले जात आहे.

Lalit Patil
Dasara Melava 2023 News : ठाकरे, शिंदे, मुंडे, पवारांसह यंदा धनगर समाजही घेणार दसरा मेळावा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com