Nepal Hindu Rashtra: शेजारच्या देशात म्हणजे नेपाळमध्ये सध्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चर्चेत आहेत. त्यांच्या एका पोस्टरमुळे ते चर्चेत आले असून या पोस्टरची चर्चा जगभर सुरु आहे. नेपाळमधील पोस्टर वाद अन् योगी आदित्यनाथ आणि नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शाह का ट्रेंड होत आहेत, हे जाणून घेऊया. योगींच्या एका पोस्टरमुळे नेपाळच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे.
नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये नेपाळचे माजी राजे ज्ञानेंद्र शाह यांच्या स्वागतासाठी १० मार्च रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या विविध भागांतील धार्मिक स्थळांना भेटी दिल्यानंतर पोखरा येथून सिमरिक एअरच्या हेलिकॉप्टरने रविवारी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते उतरले. यावेळी त्यांचे समर्थक राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाचे (आरपीपी) नेते आणि कार्यकर्त्यांसह हजारो समर्थकांनी त्यांच्या बाजूने घोषणा देण्यास सुरुवात केली.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
नेपाळमध्ये राजेशाही आणि हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेसाठी पाठिंबा दर्शविणे हा या रॅलीचा उद्देश होता. विमानतळाबाहेर रस्त्याच्या दुतर्फा ज्ञानेंद्र यांचे फोटो आणि राष्ट्रध्वज घेऊन मोटारसायकलवरून शेकडो समर्थकांनी त्यांचे स्वागत केले. काही समर्थकांकडे ज्ञानेंद्र यांच्या फोटोसोबत योगी आदित्यनाथ यांचा फोटो होता. या घटनेनंतर काही वेळातच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
ज्ञानेंद्र यांच्यासोबत योगी आदित्यनाथ यांचे पोस्टर झळकल्याने राजकीय पक्षासोबत सोशल मीडियावर त्यावर काही जणांकडून टीका होत आहे. नेपाळमधील घडामोडीवर भारत लक्ष ठेवून असल्याचे नेपाळमधील नागरिकांचे मत आहे. जानेवारी महिन्यात ज्ञानेश यांनी उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यात योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती.
सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर आरपीपीचे प्रवक्ते ज्ञानेंद्र शाही यांनी आदित्यनाथ यांचा फोटो लावणे हा केपी ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राजेशाहीसमर्थक चळवळीला बदनाम करण्याचा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
ओली सरकार घुसखोरीच्या माध्यमातून ही चळवळ चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान केपी ओली यांचे मुख्य सल्लागार बिष्णु रिमल यांच्या सूचनेनुसार आणि ओली यांच्या सल्ल्यानुसार रॅलीत योगी आदित्यनाथ यांचे छायाचित्र लावण्यात आल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियावर केला आहे.
रिमल यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. चुकून जबाबदार पदांवर पोहोचलेल्या अपात्र व्यक्तींनी चुकीच्या माहितीद्वारे निर्माण केलेला हा भ्रम होता, असा टोला त्यांनी लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.