Rabri Devi : मुख्यमंत्री सभागृहात भांग पिऊन येतात! माजी मुख्यमंत्री राबडी देवी संतापल्या; विधीमंडळात काय घडलं?

Bihar Assembly session 2025 Live: 'नितीश कुमार हे भंगेडी (गंजेडी) आहेत. ते विधीमंडळात भांग पिऊन येतात. ते सभागृहात महिलांचा अपमान करतात,' असा हल्लाबोल राबडी देवी यांनी केला.
Rabri Devi on Nitish Kumar
Rabri Devi on Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) नेत्या, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.विधान परिषदेत मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले.

नितीश कुमार यांनीही राबडी देवी यांच्यावर टोकाची टीका केली. चर्चा सुरु असताना राबडी देवी यांनी सभागृह सोडून गेल्या. त्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधकांनी नितीश कुमार यांच्या विरोधात घोषणा दिला.

'नितीश कुमार हे भंगेडी (गंजेडी) आहेत. ते विधीमंडळात भांग पिऊन येतात. ते सभागृहात महिलांचा अपमान करतात,' असा हल्लाबोल राबडी देवी यांनी नितीश कुमार यांच्यावर केला. आम्ही सत्तेत होतो तेव्हा आम्ही कसे काम केले. त्यांच्या जवळ जे लोक असतात, त्याबाबतचे ते बोलत असतात. भाजपचे नेते त्यांना मार्गदर्शन करीत असतात, त्याप्रमाणे नितीश कुमार बोलतात, असे राबडी देवी म्हणाल्या

राबडी देवी यांच्याकडे पाहत नितीश कुमार यांनी विधान परिषदेत म्हणाले, "ही माणसं जेव्हा सत्तेत होती तेव्हा कामे होत नव्हती. आता आम्ही राज्यात विकासाची कामे करीत आहोत. हिंदू-मुस्लिमांची भांडणे आम्ही कमी केली. महिलांसाठी आम्ही आरक्षण देऊन त्यांच्या हाताला काम दिले," असे सांगत त्यांनी राबडी देवी यांचे सुपूत्र तेजस्वी यादव यांच्यावरही निशाणा साधला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

त्यानंतर तेजस्वी यादव भडकले, नितीश कुमार यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. ते महिलांचा अपमान करीत आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे तेजस्वी यादव म्हणाले.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर तेजस्वी यांनी घणाघात केला. बिहारमध्ये गुन्ह्याची संख्या वाढत आहेत. सरकारमधील लोक शांत बसले आहेत, मुख्यमंत्री हे गुन्हेगारांना सोडविण्याचे काम करीत आहेत, असा आरोप तेजस्वी कुमार यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com