CJP Leaders Released | Abhijeet Dipke | Delhi Police Sarkarnama
देश

CJP Leaders Released : दिपके, रांका, दास यांची सुटका होताच सीजेपीने दिल्ली पोलिसांना डिवचलं; म्हणाले, "झुरळं कधीच..."

Cockroach Janata Party released : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जंतरमंतरवर आंदोलन करण्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीने केली होती. मात्र, आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके आणि सहसंयोजक सौरव दास व आशुतोष रांका यांना ताब्यात घेतलं होतं.

Jagdish Patil

CJP Leaders Released : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यासह सहसंयोजक सौरव दास आणि आशुतोष रांका यांची दिल्ली पोलिसांकडून सुटका करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं होतं.

मात्र, कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले. या सुटकेनंतर कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडियावर पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'झुरळे कधीच मरत नाहीत', असं म्हणत पक्षाने दिल्ली पोलिसांना डिवचलं आहे.

कॉकरोच जनता पार्टीच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली आहे. 'अखेर दिल्ली पोलिसांना अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांची सुटका करण्यास भाग पाडलं. झुरळे कधीच मरत नाहीत,' असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिन्ही नेत्यांच्या सुटकेनंतर पक्षाने केलेल्या या पोस्टची सध्या चर्चा सुरू आहे.

नेमकं काय घडलं होतं?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जंतरमंतरवर आंदोलन करण्याची घोषणा कॉकरोच जनता पार्टीने केली होती. मात्र, आंदोलनापूर्वीच दिल्ली पोलिसांनी पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके आणि सहसंयोजक सौरव दास व आशुतोष रांका यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या तिघांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं.

सुनावणीदरम्यान दंडाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले. या तिघांनी असं नेमकं काय केलं होतं की त्यांना विमानात जाऊन ताब्यात घेण्यात आलं, असा सवालही करण्यात आला. त्यानंतर तिघांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले. पुढील एक वर्ष शांतता भंग करणार नाही, या अटीवर त्यांची सुटका करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT