CJP Abhijeet Dipke Sarkarnama
देश

CJP Protest : 'काॅक्रोच' दिल्लीत दाखल! 'जंतर-मंतर'वर आज आंदोलन, तगडा पोलिस बंदोबस्त!

Cockroach Janata Party Jantar Mantar : आज दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीकडून जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी अभिजित दीपके हे देखील भारतात आले आहेत.

Roshan More

Abhijit Dipke News : कॉक्रोच जनता पार्टी आज दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करणार आहे. पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके हे अमेरिकेवरून या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भारतात आज सकाळी दाखल झाले आहेत. त्यांनी आपल्या समर्थकांना विमानतळावर न येण्याचे आवाहन देखील केले होते.

नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यानंतर शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कॉक्रोच जनता पार्टीकडून करण्यात आली होती.राजकीय पार्टी म्हणून या पार्टीची नोंदणी करण्यात आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावर या आंदोलनाला मोठा पाठींबा मिळताना दिसत आहे.

काॅक्रोच पार्टीच्या या आंदोलनात सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहेत. हे कोणत्या पक्षाचे आंदोलन नाही तर युवकांचे आंदोलन आहे. युवकांच्या भवितव्याशी खेळाच्या प्रयत्न केला जात आहे, असे काॅक्रोच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

मोठा पोलिस बंदोबस्त

या आंदोलनासाठी जंतर-मंतरवर आंदोलकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येथे दिल्ली पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून काळजी घेण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT