New Delhi News : कॉक्रोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटी प्रकरण आणि शैक्षणिक दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोठं लढा उभारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर देशाची राजधानी नवी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठं आंदोलन छेडण्यात आलं आहे. तसेच अभिजीत दीपके यांच्या सीजेपीनं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारला धारेवर धरलं आहे. याचदरम्यान,आता सीजेपीनं मोठी घोषणा केली आहे.
दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीकडून सोमवारी(ता. 20 जुलै) संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. या लाठीचार्जनंतर देशभरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. त्या विरोधात कॉक्रोच जनता पार्टीनं शुक्रवारी(ता. 24 जुलै) देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीकडून उद्या देशभरात आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र, ही आंदोलनं शांततापूर्ण मार्गानं करण्याचं आवाहनही केलं आहे. तसेच या आंदोलनात देशभरातील विद्यार्थी, सामाजिक संघटना यांनी सहभागी व्हावं असंही सीजेपीनं म्हटलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टीनं हे आंदोलनं प्रत्येक राज्य, जिल्हा पातळीसह संपूर्ण देशभरात एकाचवेळी करण्यात यावं अशी भूमिका मांडली आहे. तसेच संबंधित आंदोलनासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्याच्या सूचनाही सीजेपीकडून देण्यात आल्या आहेत.
आंदोलनस्थळी सर्वजण एकत्र आल्यानंतर सर्व संघटनांनी सीजेपीनं उचलून धरलेल्या चार मागण्यांचं उपस्थितांसमोर वाचन करावं असंही सांगण्यात आलं आहे. तसेच आंदोलनावेळी इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय या घोषणा दिल्या जाव्यात असंही सीजीपेकडून सांगण्यात आलं आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती खालावली आहे. याबाबत त्यांनी स्वत: माहिती दिली आहे. त्यांनी आज मी जंतर-मंतरवर दिसलो नाही तर मला माफ करा, अशी पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
'एक्स'वरील पोस्टमध्ये अभिजीत दिपके म्हणतात, "मला गेल्या काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीचा त्रास होत आहे. आतापर्यंत मी पेनकिलर गोळ्या घेऊन काम चालवत होतो. परंतु, आज मी जंतर-मंतरवर दिसलो नाही, तर मला माफ करा. पूर्णपणे ठीक होण्यासाठी मला काही तासांच्या विश्रांतीची अत्यंत गरज आहे. काळजी करू नका, संध्याकाळपर्यंत मी पुन्हा विरोध-प्रदर्शन होणाऱ्या ठिकाणी परत येईन असं त्यांनी जाहीर केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.