Khalil Shaikh Case: खलील शेख आत्महत्या प्रकरण: रवींद्र धंगेकरांना न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर,तर मनसेच्या बाळा शेडगेंना दणका

Khalil Sheikh suicide case : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील रज्जुलाल शेख यांनी काही दिवसांपूर्वी गुलटेकडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेला व्हिडिओ व सुसाईड नोटमध्ये आर्थिक फसवणूक, थकीत रक्कम आणि मानसिक त्रास यांना कंटाळून जीवन संपवत असल्याचं सांगितलं होतं.
Khalil Shaikh Death Case | Ravindra Dhangekar
Khalil Shaikh Death Case | Ravindra DhangekarSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार खलील शेख यांनी काही दिवसांपूर्वी राहत्या घरात आत्महत्या केली. आत्महत्येआधी त्यांनी एक व्हिडीओ तयार करत त्यात माजी आमदार शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. आता याप्रकरणी न्यायालयातून मोठी अपडेट समोर आली आहे.

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील रज्जुलाल शेख यांनी काही दिवसांपूर्वी गुलटेकडी येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी बनवलेला व्हिडिओ व सुसाईड नोटमध्ये आर्थिक फसवणूक, थकीत रक्कम आणि मानसिक त्रास यांना कंटाळून जीवन संपवत असल्याचं सांगितलं होतं. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीसह १४ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

आता न्यायालयानं माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना मोठा दिलासा आहे. त्यांना न्यायालयानं धंगेकरांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. तर दुसरीकडे मनसे नेते बाळा शेडगे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. हा त्यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

उत्कर्ष असोसिएट्स’ या फर्मच्या प्रकल्पावरून आणि आर्थिक व्यवहारांवरून माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, आणि वर्षा शेडगे यांच्यासह 14 जणांवर खलील शेख यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

Khalil Shaikh Death Case | Ravindra Dhangekar
CJP Protest: एकेकाळी मोदी-शहांचा कट्टर समर्थक राहिलेला नेता आला समोर, 'सीजेपी'च्या पेटलेल्या आंदोलनात घेतली उडी,भाजप सरकारला झाप झाप झापलं

बांधकाम व्यावसायिक खलील शेख मृत्यू प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्या अडचणी वाढल्या होत्या. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही नॉट रिचेबल असून अज्ञातस्थळी गेल्याची माहिती समोर आलीय. अटक टाळण्यासाठी त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. आता त्यांच्या जामीन अर्जावर न्यायालयानं निकाल दिला आहे.

धंगेकर पती-पत्नी यांच्या शोधासाठी पुणे पोलिसांकडून विशेष पथके रवाना केली आहे. खलील शेख यांच्या आत्महत्येप्रकरणाचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत. शेख यांनी त्यांच्या कामाचे पैसे न मिळाल्याने आणि आर्थिक तणावामुळे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला होता.

Khalil Shaikh Death Case | Ravindra Dhangekar
Parliament news : भाजपच्या खासदारांना प्रियांका गांधी भिडल्या; संसदेच्या आवारात सत्ताधारी-विरोधकांमध्ये घमासान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com